पुणे : जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठ्यात वाढ
पुणे, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे झाल्यामुळे या परिसरात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. जुन्नर तालुक्यात कुकडी प्रकल्पा
पुणे : जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठ्यात वाढ


पुणे, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे झाल्यामुळे या परिसरात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

जुन्नर तालुक्यात कुकडी प्रकल्पात असलेली येडगाव, माणिकडोह, चिल्हेवाडी, पिंपळगाव जोगे वडज अशी पाच धरणे आहेत. मात्र, ही पाच धरणे या तालुक्यात असली तरी तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, आणे, नळवणे, पेमदरा, रानमळा, उंचखडक, गुळूजवाडी, बांगरवाडी, शिंदेवाडी या गावांमध्ये पूर्वी पाण्याची अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असायची. तसेच, तालुक्याच्या पूर्व भागात असलेली काही गावे पठार भागावर मोडतात, त्यामुळे धरणाचे पाणी पठारभागावर नेण्यासाठी खूप अडचणी असल्यामुळे या भागातील गावामध्ये सतत दुष्काळच जाणवत होता. त्यातच या परिसरात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे.

या परिसरात पाऊस पडल्यानंतर ते पाणी वाहून जायचे. या परिसरात साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातच विहिरीची पाण्याची पातळी अतिशय खालावलेली असायची. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाच ते सहा महिने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या परिसरात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सिमेंट बंधारे, पाझर तलाव, नाला खोलीकरण, धरणातील गाळ काढणे आदी कामे करण्यात आली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande