जळगाव : केळीच्या बागेत गांजाची लागवड
जळगाव, 19 नोव्हेंबर, (हिं.स.) - शेतकऱ्याने आपल्याच शेतात आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या अवैधपणे गांजाची झाडे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुक्ताईनगर तालुक्यातील माणगाव शिवारात हा प्रकार समोर आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव स्थ
जळगाव : केळीच्या बागेत गांजाची लागवड


जळगाव, 19 नोव्हेंबर, (हिं.स.) - शेतकऱ्याने आपल्याच शेतात आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या अवैधपणे गांजाची झाडे लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुक्ताईनगर तालुक्यातील माणगाव शिवारात हा प्रकार समोर आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, माणगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती सुरू आहे. यांनतर गायकवाड यांनी तातडीने पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन आज बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास माणगाव शिवारातील एका शेतात धाड टाकली.यावेळी, केळीच्या झाडांच्या गर्दीत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गांजाच्या झाडांची अवैध लागवड केल्याचे पोलिसांना आढळून आले.

गांजाची ही झाडे मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती आणि त्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असू शकते, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी लागवड केलेली गांजाची सर्व झाडे पूर्णपणे उध्वस्त केली आणि पुरावा म्हणून काही नमुने जप्त केले. या कारवाईमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध गांजा लागवडीच्या गोरखधंद्याला मोठा झटका बसला असून गांजाची लागवड करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्याची कार्यवाही मुक्ताईनगर पोलिसांकडून सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande