
पुणे, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। मुंढव्यातील जमीन गैरव्यवहारप्रकरणी तपास करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या खारगे समितीचा अहवाल २४ नोव्हेंबरला अंतिम होण्याची शक्यता आहे. महसूल नोंदणी व भूमी अभिलेख विभागांना अतिरिक्त माहिती जमा करून त्याचा एकत्रित अहवाल २४ नोव्हेंबरच्या बैठकीपूर्वी सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत.
मुंढव्यातील जमीन गैरव्यवहारप्रकरणी तपास करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या खारगे समितीचा अहवाल २४ नोव्हेंबरला अंतिम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या समितीच्या आज झालेल्या बैठकीत खारगे यांनी महसूल नोंदणी व भूमी अभिलेख विभागांना अतिरिक्त माहिती जमा करून त्याचा एकत्रित अहवाल २४ नोव्हेंबरच्या बैठकीपूर्वी सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना सुचविण्याचे आदेशही दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु