सोलापुरात आय टी पार्कचा मार्ग मोकळा; दीड वर्षात होणार पार्क
सोलापूर, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। नियोजित आयटी पार्क ही होटगी येथील जलसंपदा जागेवरच होणार असून, त्यासाठी सूमारे 40 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव राज्यशासनाच्या उच्चचस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे, प्रस्तावास मंजूरी मिळाल
Collactor kumar


सोलापूर, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। नियोजित आयटी पार्क ही होटगी येथील जलसंपदा जागेवरच होणार असून, त्यासाठी सूमारे 40 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव राज्यशासनाच्या उच्चचस्तरीय समितीकडे पाठविण्यात आला आहे, प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर दिल्यानंतर 18 महिन्यांत बांधकाम पूर्ण होऊन आयटी पार्क सुरु होतील अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

गेल्या काहीं वर्षांपासून सोलापुरात आयटी पार्क सुरु करण्याची वारंवार मागणी होत होती. मागील तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी पार्कसाठी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव पाठविण्याचा आदेश जिल्हाप्रशासनाला दिले होते. त्यानूसार हिरज, कुंभारी, जुनी मिल, होटगी येथील जागेची पाहणी करण्यात आली. यात होटगी येथील जागा निश्चित करण्यात आली आहे.

होटगी येथे जलसंपदा विभागाच्या मालकीची 50 एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यात आली असून, आता तीच जागा आयटी पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. जागेसाठी सूमारे साडेतीन कोटी रुपये जलसंपदा विभागाला एमआयडीसी विभागाकडून दिले जाणार आहे. अतंर्गत रस्ते, दिवाबत्ती, पाणी आदी मुलभूत सुविधांसाठी सूमारे 37 ते 38 कोटी रुपये लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande