लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून भारतात आणले
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.) राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने मंगळवारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि त्याचा जवळचा सहकारी अनमोल बिश्नोईला अटक केली. अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करून भारतात आणण्यात आले. बिश्नोई २०२२ पासून फरार होता आ
लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून भारतात आणले


नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.) राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने मंगळवारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि त्याचा जवळचा सहकारी अनमोल बिश्नोईला अटक केली. अनमोलला अमेरिकेतून हद्दपार करून भारतात आणण्यात आले. बिश्नोई २०२२ पासून फरार होता आणि एनआयएच्या चालू तपासात अटक झालेला तो १९ वा आरोपी आहे. मार्च २०२३ मध्ये एनआयएने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले होते की, अनमोलने २०२० ते २०२३ दरम्यान देशातील अनेक मोठ्या गुन्ह्यांमध्ये गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांना मदत केली होती. तपासानुसार अनमोल अमेरिकेतून लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी दहशतवादी सिंडिकेट चालवत होता. त्याने टोळी सदस्यांना आश्रय, पैसे आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला. तो परदेशातून भारतात धमक्या आणि खंडणीमध्येही गुंतला होता. एनआयए अजूनही या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.

अनमोल बिश्नोईला २०२४ मध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. अमेरिकेत अटक झाल्यापासून देशातील सर्व सुरक्षा एजन्सी त्याला भारतात परत आणण्यासाठी काम करत आहेत. अनमोल बिश्नोई हा देशातील सर्वात कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. अनमोल बिश्नोईला अमेरिकन कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी अटक केली होती. बिश्नोई कॅनडामध्ये राहत होता आणि तिथून भारतात गुन्हे करत असे. पण तो कॅनडा आणि अमेरिकेदरम्यान वारंवार प्रवास करत होता. ज्यामुळे त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली.

एनआयएने अनमोल बिश्नोईसाठी बक्षीस देखील जाहीर केले होते. गेल्या वर्षी एनआयएने त्याला त्यांच्या मोस्ट वॉन्टेड यादीत समाविष्ट केले. एनआयएने अनमोलच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यांना १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बाबा सिद्दीकी हत्याकांड आणि सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारात त्याचे नाव चर्चेत राहिले. गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येत गोळीबार करणाऱ्यांना मदत केल्याचा आरोपही अनमोल बिश्नोईवर आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अनमोल बिश्नोईचे नाव समोर आले होते. तेव्हापासून अनमोल बिश्नोईला अटक करण्याचे प्रयत्न तीव्र झाले आणि आता एनआयएच्या प्रयत्नांना यश आले आहे आणि अखेर अनमोल बिश्नोईला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande