
परभणी, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। विज्ञान भारती, NCSM, NCERT तसेच केंद्रीय सांस्कृतिक व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी विज्ञान मंथन 2025 परीक्षेत मराठवाडा हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर आपली छाप उमटवत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
शाळेतील समीरण नेताजी गिरी आणि पियुष दिलीप लासे यांनी राज्यस्तरीय ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण होत राष्ट्रीय पातळीवरील अंतिम टप्प्यासाठी निवड मिळवली. या यशामुळे शाळेचा मान उंचावला असून दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis