गुडघा प्रत्यारोपणात पनवेल पुढे; रोबोटिक सर्जरीचा अर्धा हजाराचा टप्पा पूर्ण
रायगड, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। पनवेल शहरातील पटेल हॉस्पिटलने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर विशेष कामगिरी नोंदवली आहे. येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. कुणाल मखिजा यांनी रोजा रोबोटच्या सहाय्याने मागील दोन वर्षांत तब्बल 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रि
गुडघा प्रत्यारोपणात पनवेल पुढे; रोबोटिक सर्जरीचा अर्धा हजाराचा टप्पा


रायगड, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। पनवेल शहरातील पटेल हॉस्पिटलने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर विशेष कामगिरी नोंदवली आहे. येथील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. कुणाल मखिजा यांनी रोजा रोबोटच्या सहाय्याने मागील दोन वर्षांत तब्बल 500 गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण करून महाराष्ट्रात पहिले स्थान पटकावले आहे. आतापर्यंत सव्वा पाचशेहून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

रोजा रोबोटिक तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे स्नायू व लिगामेंट न कापता अत्यंत अचूक (0.5 मिमी आणि 0.5 डिग्री) नी रिप्लेसमेंट करता येते. त्यामुळे रुग्ण शस्त्रक्रियेच्या त्याच दिवशी चालू शकतो, पाय अधिक चांगला वाकतो तसेच हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होतो. साधारणपणे रुग्ण पहिल्या-दुसऱ्या दिवशी चालत घरी जातो, तर 15–20 दिवसांत जवळपास नॉर्मल जीवनात पुनरागमन करतो.

डॉ. मखिजा सांगतात, “रोबोटिक सर्जरीत वयाची मर्यादा नाही. 35 वर्षांच्या तरुणांपासून ते 93 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे.” वजनदार रुग्णांसाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरले असून 120 ते 140 किलो वजनाच्या रुग्णांवरही नी रिप्लेसमेंट करण्यात आले आहे.

पनवेलसह रायगडातील ग्रामीण भाग, पेण, थळा, मंडणगड, म्हसळा, तसेच सांगली, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, यूपी, बिहार, अगदी दुबई आणि बांगलादेश येथूनही रुग्ण पनवेलमध्ये उपचारासाठी येत आहेत. सर्वच रुग्ण उत्कृष्ट परिणामांमुळे समाधानी आहेत. ही शस्त्रक्रिया सामान्य नागरिकांनाही परवडणारी असून इन्शुरन्समध्ये कव्हर होते. विशेष म्हणजे, हॉस्पिटलतर्फे रोबोटिक सर्जरीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही, असेही डॉ. कुणाल मखिजा यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande