परिवर्तन नाट्य कार्यशाळेतून सहभागींच्या विचारांना नवे पंख
धुळे , 19 नोव्हेंबर (हिं.स.) परिवर्तन नाट्य कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. याचे उद्घाटन कुलगुरू एन. के.ठाकरे तर समारोप प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. “मन, शरीर, विचार आणि ताल यांचा संयोग म्हणजे नाट्य” या शंभू पाटील सरांच्या मार्गदर्शक
नाट्य कार्यशाळा


धुळे , 19 नोव्हेंबर (हिं.स.) परिवर्तन नाट्य कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. याचे उद्घाटन कुलगुरू एन. के.ठाकरे तर समारोप प्राचार्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. “मन, शरीर, विचार आणि ताल यांचा संयोग म्हणजे नाट्य” या शंभू पाटील सरांच्या मार्गदर्शक सूत्राने कार्यशाळेची दिशा निश्चित केली. सहभागींसाठी ही कार्यशाळा आयुष्यातील आगळी वेगळी अशी पहिलीच अनुभवपूर्ण शाळा ठरली. नाट्यकलांची विविध रूपं—नृत्य, कविता, संवादकला, एफ.एम. शैलीतला आवाजाचा वापर - यांचा संगम कसा साधायचा, फक्त शब्दांनी वातावरणनिर्मिती कशी घडते, संवादाची ताकद काय असते हे सहभागीनी प्रत्यक्ष अनुभवले. “आपण बोलतो ती भाषा प्रमाण असणे” या संकल्पनेने अनेकांना नवी जाणीव दिली. नाटक - अमृता साहिर इमरोज यात जयश्री पाटील यांनी - अमृता तर शंंभु पाटील सर- यांनी इमरोज भुमिका सादर करत कार्यशाळेत इंद्रधनुष्याचे रंग पेरले. कार्यशाळेत वारंवार विचारण्यात आलेल्या “आपण विचार करतो का?” या प्रश्नातून मनाचे आणि मेंदूचे नवे दरवाजे उघडले. जगण्याकडे, नात्यांकडे आणि दृष्टिकोनाकडे पाहण्याची नव्या परिवर्तनशील दृष्टीची जाणीव सहभागीना मिळाली. या कार्यशाळेत सहभागी प्रा.वैशाली पाटील यांचे मनभाव उमटले ,प्रशिक्षण कार्यशाळेत अवघं आयुष्य जणू थांबून ऐकत होतं… माझ्या मनात उमटलेला हा नवा आत्मविश्वासाचा सूर सांगत होता, जागृतीची हलकीशी चाहूल ही कधी कधी आयुष्याला नवा जन्म देते मग वाटत “पिक्चर अभी बाकी है ,मेरे दोस्त” हा विचार मनात घेऊन सर्वजण पुढील प्रवासासाठी प्रेरित झाले.

या प्रशिक्षणात सहभागी सौ. मनिषा पाटील, प्रा.वैशाली पाटील,डॉ.मनिषा भावसार, सुनंंदा खैरनार, पपीता जोशी, रंजू खैरनार ,अपूर्वा पाटील, संगीता पाटील, प्रा.ममता भारुडे, पल्लवी पाटील, स्मिता देवरे , सुलभा मोरे, प्रा, अर्चना वळवी सहित अनेक महिला वर्ग सहभागी होते. यासाठी का.स. वाणी संस्थेच्या वैशाली सोनगीरे, रूपाली चित्ते, अक्षय नेहे व विचार पुष्पवाचक मंच , यंग फाउंडेशनने विशेष सहकार्य केले. यात धुळेकरासाठी सहभागी होऊन परिवर्तनला साद द्यावी हिच अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande