पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्षपदाचे २६ तर सदस्यपदाचे ४०४ अर्ज बाद
पुणे, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत अध्यक्षपदासाठीचे २६ अर्ज तर सदस्य पदासाठीचे ४०४ अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. दाखल अर्जांची छाननी पुर्ण करण्यात आली आ
ZP pune


पुणे, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत अध्यक्षपदासाठीचे २६ अर्ज तर सदस्य पदासाठीचे ४०४ अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. दाखल अर्जांची छाननी पुर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी १४१, तर सदस्य पदासाठी १,९४५ अर्ज वैध ठरले आहेत.सदस्यपदांसाठी २,६१८ तर अध्यक्षपदासाठी १८७ अर्ज दाखल झाले होते.

शुक्रवारपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुभा आहे. बारामती, लोणावळा, दौंड, चाकण, जुन्नर, राजगुरुनगर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले.अनेक अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी, अपूर्ण कागदपत्रे आणि पात्रतेसंबंधी अडचणी आढळल्याने अर्ज बाद ठरवण्यात आले. विशेष म्हणजे, भोर व आळंदी नगरपरिषदेत प्रत्येकी ६३ अर्ज अवैध ठरले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande