
छत्रपती संभाजीनगर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजी नगर येथील विधानसभा निवडणुकीत मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढवलेलेछत्रपती संभाजीनगर मधील शिवसेना (उबाठा) गटाचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा समर्थकांसह भाजपा परिवारात प्रवेश झाला आहे.
त्यांच्या समवेत माजी नगरसेवक प्रकाश गायकवाड, माजी नगरसेवक गोकुळ मलके, पंचायत समितीचे सदस्य सतीश पाटील, कैलास वाणी, अजय शिंदे, युवराज भालेराव, गोरख देहाडे, संदीप शिंदे, अभिजित पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे
यावेळी मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री आ. संजय केनेकर, भाजपा छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis