
सोलापूर, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यातील १२ नगरपालिकांमध्ये १२ नगराध्यक्षपदांसाठी १४६ तर नगरसेवक पदांसाठी २२६१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये पंढरपूर, कुर्डुवाडी व करमाळा नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचे सर्व अर्ज मंजूर करण्यात आले.नगराध्यक्षपदासाठीचे २५ तर नगरसेवक पदासाठीचे ४८२ उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले.
पंढरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी प्राप्त ८ पैकी ८ अर्ज मंजूर करण्यात आले. नगरसेवक पदासाठी ३६६ पैकी ३९ अर्ज बाद झाले असून ३२१ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. बार्शी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी प्राप्त १० पैकी १ अर्ज बाद झाला तर ९ अर्ज मंजूर झाले. नगरसेवक पदासाठी २९६ पैकी १०० अर्ज बाद झाले तर १९६ अर्ज मंजूर झाले.कुर्डुवाडी नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठीचे दहाचे दहा अर्ज मंजूर झाले. नगरसेवक पदासाठी १६४ पैकी १५ अर्ज बाद झाले तर १४९ अर्ज मंजूर झाले. करमाळा नगरपालिकेतील एकही अर्ज बाद झाला नाही. नगराध्यक्ष पदासाठीचे प्राप्त १५ अर्ज व नगरसेवक पदासाठीचे प्राप्त २५४ अर्ज मंजूर करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड