रत्नागिरी : प्रकाश वस्तू भांडारचे मालक श्रीकांत मुकादम यांचे निधन
रत्नागिरी, 19 नोव्हेंबर, (हिं. स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका संघचालक आणि प्रकाश वस्तू भांडारचे मालक श्रीकांत अनंत मुकादम (वय ८९) यांचे काल (दि. १८ नोव्हेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले. पटवर्धन हायस्कूल येथे शिकताना शाळेच्या कलाविहार म
रत्नागिरी : प्रकाश वस्तू भांडारचे मालक श्रीकांत मुकादम यांचे निधन


रत्नागिरी, 19 नोव्हेंबर, (हिं. स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी तालुका संघचालक आणि प्रकाश वस्तू भांडारचे मालक श्रीकांत अनंत मुकादम (वय ८९) यांचे काल (दि. १८ नोव्हेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले.

पटवर्धन हायस्कूल येथे शिकताना शाळेच्या कलाविहार मंडळाकडून नाटकांमध्ये स्त्री भूमिकाही केल्या. दहावीच्या परीक्षेनंतर नाटकाचा छंद विविध मंडळातून काम करून जोपासला जात असताना देवर्षी नारद मंडळ सुरू करून २० वर्षे आपल्या खेडेगावात उत्सवाला नाटके केली. १९५८ मध्ये अ. भा. देवरुखे ब्राह्मण संमेलन फुणगूस गावी झाले. त्यामध्ये सहकार्यवाह म्हणून काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामान्य स्वयंसेवकांपासून सुरवात करून ते तालुका संघचालक म्हणूनही कै. मुकादम कार्यरत होते. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात मुकादम यांनी तुरुंगवास भोगला. १९९२ मध्ये अयोध्या येथे श्रीराम मंदिर करसेवेत भाग घेतला. संघाचे द्वितीय संघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांच्या मूळ गावी गोळवली येथे स्मारक करण्यासाठी राष्ट्रीय सेवा समिती या संस्थेकडे दायित्व आले. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून मुकादम यांनी जबाबदारी पार पाडली.

कै. मुकादम यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, जावई असा मोठा परिवार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande