कोल्हापूर - तृतीयपंथी व्यक्तींच्या कायदेशीर हक्क व धोरणा बाबत राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। ''ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस'' म्हणून 19 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सायबर महाविद्यालय येथे , ''तृतीयपंथी व्यक्ती कायदेशीर हक्क व धोरणे '' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्
तृतीयपंथी व्यक्तींच्या कायदेशीर हक्क व धोरणासाठी राज्यस्तरीय कार्यशाळा


कोल्हापूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। 'ट्रान्सजेंडर दृश्यमानता दिवस' म्हणून 19 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सायबर महाविद्यालय येथे , 'तृतीयपंथी व्यक्ती कायदेशीर हक्क व धोरणे ' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आज संपन्न झाली.

या कार्यशाळेचे उद्घाटन सायबर महाविद्यालयाचे संचालक डॉ.आर. के. टेलर यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, अक्षय कुरणे, डी.के शिंदे स्कूल ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य,टी व्ही जी शर्मा, अधिष्ठाता श्रीमती डॉ. एस. पी .रजपूत , महाराष्ट्र राज्य विभागीय तृतीयपंथी हक्क संरक्षण आणि कल्याण मंडळाचे (पुणे) सह अध्यक्ष शिवानी गजबर आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती गजबर यांनी तृतीयपंथीयांना येणाऱ्या अडचणी तसेच सामाजिक समस्या या बाबत तर भारत युवा शक्ती ट्रस्ट कोल्हापूरचे अशितोष पाडळे यांनी तृतीयपंथीयांना स्वतंत्र उद्योग व्यवसायांसाठी करण्यात येणाऱ्या अर्थ सहाय्यतेबाबत माहिती दिली.याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी समाजातील सर्व तृतीयपंथीयांना सामाजिक प्रवाहात सामावून घ्यावे तसेच त्यांना समानतेची वागणूक द्यावी असे आवाहन केले.

मैत्री फाउंडेशन, शिवाजी विद्यापीठ सायबर महाविद्यालय,नारायणी फाउंडेशन व डी. के.शिंदे सामाजिक कार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात ६ जणांना तृतीयपंथी - प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच या कार्यक्रमामध्ये सामाजिक हल्ल्यात मृत्यू पावलेल्या तृतीयपंथीयांना सामूहिकरित्या श्रद्धांजली वाहण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande