
मुंबई, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईच्या हितासाठी जे योग्य असेल तसेच संविधानाच्या चौकटीत असेल त्या भूमिकेला आमची नेहमीच साथ असेल आणि पुढेही राहील. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, गेले महिनाभर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ साहेब हॉस्पिटल मध्ये आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात मी होते. Icu मध्ये होते तेव्हा मी गेले नाही. आज किंवा उद्या त्यांना डिस्चार्ज देखील मिळेल. त्यांची तब्येतीची विचारपूस करण्याकरिता आज हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काँग्रेसचे शिष्टमंडळ आज आदरणी शरद पवार साहेब यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी महाराष्ट्र मधील आणि मुंबईतील अनेक प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. पुढच्या आठवड्यात सविस्तर आम्ही बसून चर्चा करणार आहोत. बारकाईने चर्चा झाली नाही. काँग्रेस सोबत सहकार्याची भूमिका आम्ही कायम राहिली आहे. ती पुढेही राहील. एका आठवड्यात पूर्ण चित्र स्पष्ट होईल. आम्ही महाराष्ट्र आणि मुंबईच्या हितासाठी जी भूमिका असेल त्यासोबत आम्ही कायम राहू असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्याकडे कोणाचं पत्र आलेलं नाही. माझ्या ऑफिसमध्येही आलेलं नाही. ते मला का लिहीत आहेत मला माहित नाही. ड्रग्स विरोधात मोहिमे बदल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होत. ड्रग्स प्रकरणात माझ्या भावना आई आणि नागरिक, लोकप्रतिनिधी म्हणून मी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं होते. त्यांनी मला का स्पष्टीकरण दिलं आहे. हे मला माहित नाही. चॅनेलवर जे दाखवलं त्यावरून मी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं आहे. आमच्या तुमच्या पक्षाचा असेल त्याच्या बदल सहनशीलता दाखवता कामा नये. खरंतर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांनाही पत्र लिहायला हव होते. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रवर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून मी विनंती करते की कॅबिनेट वर बहिष्कार टाकू नाका. जर कॅबिनेट वर बहिष्कार टाकणं म्हणजे जनतेच्या प्रश्नावर चर्चा न करणं होईल. एका कामासाठी गेलात आणि ते नाही झाल तर राजीनामा देता येतो. सरकार तुमचं आहे जर तुम्हालाच न्याय मिळत नसेल तर खाली उतरा. तसेच त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे.असे सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,लोकसंख्या वाढ, वाहतुकीतील गोंधळ, ड्रग्जचे प्रकरण, तरुणांचे वाढते व्यसनाधीनता आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे पुण्यात गुन्हेगारीचा ग्राफ वाढत आहे.शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पोलिसांवर प्रचंड ताण आहे. गुन्हे रोखण्यासाठी अधिक व्यवस्थात्मक पावले उचलली पाहिजेत, अशा शब्दांत त्यांनी शासनाला सूचना केल्या. याचबरोबर पीपीपी मॉडेलऐवजी सीएसआर निधीतून रुग्णालये चालवण्याचा पर्याय अधिक उपयोगी ठरेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर