लातूर : लोकगीतातून मतदार जनजागृती
लातूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, शहराच्या मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने SVEEP (सिस्टिमॅटिक व्होटर्स एज
अध्यापक महाविद्यालय अहमदपूर


लातूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, शहराच्या मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने SVEEP (सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) पथकाद्वारे विविध उपक्रम राबवले जात आहेत.

अध्यापक महाविद्यालय अहमदपूर येथे मूल्यवर्धन प्रशिक्षणादरम्यान स्वीप कलापथकाने मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रबोधनात्मक लोकगीतातून प्रभावी मतदार जनजागृती केली.

​स्वीप पथकाने यावेळी उपस्थित मतदारांना हा राष्ट्रीय लोकउत्सव मानून प्रत्येकाने मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच, आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला मतदानाचे महत्त्व समजावून सांगून, संविधानाने दिलेला हक्क २ डिसेंबर रोजी मतदान करून बजावावा, असा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

​सहाय्यक निवडणूक अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, मुख्याधिकारी (नगरपरिषद, अहमदपूर) प्रतीक लंबे, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, आणि केंद्रप्रमुख शफियोद्दीन बाबन कासार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात स्वीप पथकाद्वारे ही जनजागृती मोहीम राबवली जात आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande