
जालना, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।सदस्थितीत जिल्हात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची अंमलबजावणी सुरू असून यातंर्गत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घनसावंगी तालुक्यातील राजेगाव शाळेस भेट देवून विद्यार्थांशी संवाद साधला व मुलांचा अभ्यास देखील घेतला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेगाव येथील परिसराची जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पाहणी केली व नंतर त्यांनी आठवीच्या वर्गात जाऊन मुलांना स्वतः गणित विषयाची उदाहरणे दिली व सोडविण्यासाठी सांगितले. मुलांनी जिल्हाधिकारी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. मुलांची गुणवत्ता बघून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व मुलांचे व शाळेचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी राजेगाव येथील ग्राम पंचायत, मंदिर तसेच गावाची पाहणी केली. यावेळी उप जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन श्रीमती नम्रता चाटे, उपविभागीय अधिकारी अंबड उमाकांत पारधी, तहसीलदार घनसावंगी वंजारी मॅडम नायब तहसीलदार इथापे, ग्रामसेवक धर्मा लहामगे, यांच्यासह राजेगाव येथील गजानन उगले नवनाथ उगले, श्रीधन कोरडे,विठ्ठल उगले,वसंत कोरडे,भरत कोरडे तुकाराम सपाटे,राजेंद्र थोरात, गुलाबराव सपाटे,आसाराम कोरडे,राजेंद्र उगले,भरत कोरडे, परमेश्वर टरले,भागवत उगले,नवनाथ सपाटे,किसन सपाटे शालेय समिती राजेगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेगाव येथील कल्याण वाघमारे, कैलास आरगडे, अमोल धांडगे, कसबे सर,श्रीमती घुले ,श्रीमती शेळके , पोषण आहार मदतनीस उगले,छाया देवडे, यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis