स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे नेतृत्व विश्वव्यापी होते - छाजेड
नाशिक, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। अमेरिका सारख्या बलाढ्य देशाच्या विरोधाला झुगारून पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारून बांगलादेश सारख्या देशाचा जन्म स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केला असा पराक्रम जगातल्या कुठल्याही देशाच्या प्रमुखांनी आजपर्यंत केलेला नाही. भ
स्वर्गीय इंदिराजी गांधी यांचे नेतृत्व विश्वव्यापी होते. -  छाजेड


नाशिक, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। अमेरिका सारख्या बलाढ्य देशाच्या विरोधाला झुगारून पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारून बांगलादेश सारख्या देशाचा जन्म स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी केला असा पराक्रम जगातल्या कुठल्याही देशाच्या प्रमुखांनी आजपर्यंत केलेला नाही. भारत देशात गरीबी हटाव पंचसूत्री कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी अमलात आणला. जगातील विविध देशांच्या मदतीला धावून जात असताना जगातील बलाढ्य देशांच्या यादीमध्ये भारत देशाला आणण्याचे काम भारतरत्न माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केला आहे त्यामुळे त्यांचे नेतृत्व विश्वव्यापी होते, असे प्रतिपादन नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शालिमार येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे अभिवादनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहर काँग्रेसचे ज्येष्ठ सचिव श्रीकांत शेरे यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी व नाशिक जिल्हा या समीकरणांचा आढावा घेत इंदिराजी गांधी यांच्या नाशिक मध्ये झालेल्या दौऱ्यांबद्दल माहिती दिली व त्या काळातील इंदिरा गांधी व काँग्रेस संघटना यांच्या आठवणींना उजाळा दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande