रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तेरावे देहदान
रत्नागिरी, 19 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तेरावे देहदान पार पडले. विजयकुमार वासुदेव आगाशे (वय ८६ वर्षे, रा. बंदर रोड, रत्नागिरी) यांचे काल सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कै. आगाशे यांनी १९६२ ते १९९३ दरम्यान रत्नागिर
रत्नागिरीत तेरावे देहदान


रत्नागिरी, 19 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तेरावे देहदान पार पडले.

विजयकुमार वासुदेव आगाशे (वय ८६ वर्षे, रा. बंदर रोड, रत्नागिरी) यांचे काल सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कै. आगाशे यांनी १९६२ ते १९९३ दरम्यान रत्नागिरी पोलीस दलामध्ये सेवा दिली. ते एएसआय म्हणून रत्नागिरी पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले. कै.आगाशे यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज झाले.

कै. आगाशे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. देहदानाच्या वेळी कै. आगाशे यांचे दोन्ही पुत्र प्रदीप आणि सचिन आगाशे उपस्थित होते. देहदानाच्या संपूर्ण प्रकियेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव व शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, कर्मचारी मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर यांनी काम पाहिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande