भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा ट्रम्प यांच्या दाव्याची संख्या आता ६० वर -जयराम रमेश
नवी दिल्ली , 19 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की त्यांनी भारत–पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यात भूमिका बजावली होती. ट्रम्प यांनी बुधवारी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच
भारत-पाकिस्तान संघर्ष थांबवल्याचा ट्रम्प यांच्या दाव्याची संख्या आता ६० वर -काँग्रेस महासचिव


नवी दिल्ली , 19 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की त्यांनी भारत–पाकिस्तानमधील संघर्ष थांबवण्यात भूमिका बजावली होती. ट्रम्प यांनी बुधवारी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या उपस्थितीत ऑपरेशन सिंदूर संदर्भात हे दावे केले. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आणि म्हटले की ट्रम्प अशा दाव्यांची संख्या आता 60 वर पोहोचली आहे.

काँग्रेसचे महासचिव (संचार) जयराम रमेश यांनी एक्सवर लिहिले,“जेव्हा वाटले की हे दावे थांबले, तेव्हाच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगाला पुन्हा आठवण करून दिली. सौदी क्राउन प्रिन्ससोबतच्या बैठकीत ट्रम्प यांनी पुन्हा सांगितले की त्यांनी हस्तक्षेप करून ऑपरेशन सिंदूर रोखले होते.”

रमेश पुढे म्हणाले, “नक्कीच, याआधी ते सौदी अरेबिया, कतार, इजिप्त, ब्रिटन, नेदरलँड, जपान आणि अनेक इतर प्रेस परिषदांमध्येही हा दावा करत आले आहेत. आता ही संख्या 60 वर पोहोचली आहे.”

द्विपक्षीय बैठकीदरम्यान ट्रम्प म्हणाले,“मी खरोखर आठ युद्धे थांबवली आहेत. आणखी एक उरले आहे—(रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर) पुतिन असलेला. पुतिनबाबत मी थोडा आश्चर्यचकित आहे, यात जरा जास्त वेळ लागला. पण आम्ही भारत आणि पाकिस्तानला थांबवले. काश मी संपूर्ण यादी सांगू शकलो असतो. ती यादी तुम्हाला माझ्यापेक्षा चांगली माहिती आहे.”ते पुढे म्हणाले, “मला याचा अभिमान आहे की मी असा एक संघर्ष रोखला जो पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर होता. हे सर्व इथेच ओव्हल ऑफिसमध्ये झाले—कधी फोनवर, तर कधी नेते येथे भेटायला आले तेव्हा. अनेक नेत्यांनी इथेच ओव्हल ऑफिसमध्ये शांतता करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.”दरम्यान, ट्रम्प 10 मेपासून अनेक वेळा हा दावा करत आले आहेत की भारत–पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यात त्यांची भूमिका होती. मात्र भारत सातत्याने कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीला नकार देत आला आहे.

याआधी काँग्रेसने याच महिन्यात पंतप्रधान मोदी यांनाही टोला लगावला होता. त्यावेळी ट्रम्प यांनी म्हटले होते की भारताने मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले आहे. यावर काँग्रेसने विचारले होते, “या सगळ्यावर ‘हाऊडी मोदी’ काय म्हणतात?”

-----------------------

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande