राजधानीत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले. या प्रसंगी महाराष्ट्र परिचय के
नवी दिल्ली


नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

या प्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहाय्यक लेखा अधिकारी निलेश केदारे तसेच महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी शपथ दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande