
सोलापूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदिप खरबस यांनी मंजूर कामाचे बिल काढण्यासाठी दोन हजार रूपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र, खरबस यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली नव्हती. त्यामुळे तब्बल 17 दिवसानंतर जंगम यांनी विस्तार अधिकारी खरबस यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी खरबस यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. तसेच या काळात पंढरपूर पंचायत समिती कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, खरबस हे दक्षिण पंचायत समिती येथेच काम करत असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सीईओ जंगम यांनी विस्तार अधिकाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड