अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तातडीने सुरू करा - अण्णा बनसोडे
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधानभवनात वैद्यक
मुंबई


मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानभवनात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत लातूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील चार सुपर स्पेशालिटी रुग्णालये खासगी भागीदारी धोरणानुसार सुरू करण्याबाबत आढावा बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त अनिल भंडारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तात्काळ सुरू करण्यात यावीत. छत्रपती संभाजीनगर व लातूर सुपर स्पेशालिटी रुग्णालयासंदर्भातील कार्यवाहीही तातडीने करण्याचे निर्देश उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande