ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन : आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
कॅनबेरा, 20 नोव्हेंबर (हिं.स.)ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये, युवा भारतीय शटलर आयुष शेट्टी आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी परस्परविरोधी विजयांसह उपांत्यपूर्व फएरीतील आपले स्थान निश्चित केले. हे दोन्ही भारतीय बॅडमिंटनपटू आता
लक्ष्य सेन


कॅनबेरा, 20 नोव्हेंबर (हिं.स.)ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये, युवा भारतीय शटलर आयुष शेट्टी आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी परस्परविरोधी विजयांसह उपांत्यपूर्व फएरीतील आपले स्थान निश्चित केले. हे दोन्ही भारतीय बॅडमिंटनपटू आता अंतिम आठमध्ये एकमेकांसमोर येतील. अनुभवी एच.एस. प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.

अव्वल मानांकित सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनीही चिनी तैपेईच्या सु चिंग हेंग आणि वू गुआन शुन यांचा २१-१८, २१-११ असा पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश केला. सात्विक आणि चिराग पुढील फेरीत पाचव्या मानांकित इंडोनेशियन जोडी फजर अल्फियान आणि मुहम्मद शोहिबुल फिक्री यांच्याशी सामना करावा लागणार आहे.

यूएस ओपन सुपर ३०० चॅम्पियन आयुष शेट्टी यांनी ६८ मिनिटांच्या सामन्यात चौथ्या मानांकित जपानच्या कोडाई नारोकाचा २१-१७, २१-१६ असा पराभव केला. या वर्षी नारोकावर २० वर्षीय भारतीय बॅडमिंटनपटूचा हा दुसरा विजय होता. आता त्याची गाठ सातव्या मानांकित लक्ष्य सेनशी पडणार आहे.

लक्ष्य सेनने चिनी तैपेईच्या ची यू जेनचा २१-१७, १३-२१, २१-१३ असा पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश केला. सेनला यापूर्वी मलेशिया ओपनमध्ये याच बॅडमिंटनकडून पराभव सहन लागला होता.

एचएस प्रणॉयची या स्पर्धेत लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. आठव्या मानांकित इंडोनेशियाच्या फरहान अल्वीने त्याचा १९-२१, १०-२१ असा पराभव केला. दरम्यान, जपानच्या शोगो ओगावाने किदाम्बी श्रीकांतला २०-२२, १६-२१ ने मात दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande