
नाशिक , 20 नोव्हेंबर (हिं.स.)। अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे सातवे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत ठक्कर डोम नाशिक येथे होणार असून, स्टॉल बुकिंग हाउसफुल झाल्याची माहिती आयमाचे अध्यक्ष ललित बुब व आयमा इंडेक्स महाकुंभचे अध्यक्ष वरुण तलवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
यावेळी बुब यांनी पत्रकार परिषदेत आयमा इडेक्समहाकुंभाविषयी रूपरेषा सांगितली. यावेळी आयमा अध्यक्ष ललित बुब, सरचिटणीस प्रमोद वाघ, बीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, आयमा इंडेक्स महाकुंभचे चेअरमन वरुण तलवार, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, खजिनदार गोविंद झा, आयपीपी निखिल पांचाल उपस्थित होते. तसेच गो ग्रीन व स्टार्टअप्सद्वारे नवीन गुंतवणुकीवर भर असल्याचे बुब यांनी यावेळी नमूद केले. अविकसित देश विकसित देशाच्या मदतीने पुढे जाणार आहे. छोटे देश त्याच्या प्रगतीसाठी आता भारताची मदत घेणार असल्याचे ते म्हणाले. तर तलवार यांनी या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी दक्षिण कोरिया, तैवान, सोमालिया, इंडो जर्मन व इतर देशांचे शिष्टमंडळ येणार आहे. याचा आयात-निर्यातीला फायदा होणार आहे. बीटूबी तसेच २० स्टार्टअप्सद्वारे उद्योग उभारणीसाठी आयमा प्रयत्नशील राहणार आहे. आयमा इंडेक्स महाकुंभचे बुकिंग पूर्ण झाले आहे. ड्रोण शो प्रमुख आकर्षण असल्याचे तलवार यांनी सांगितले. या प्रदर्शनात एसी डोम उभारणी होणार आहे. आयमा बीओपीपीचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे यांनी ऑटोमोटिव्ह, इंजिनिअरिंग, फूड प्रोसेसिंग, एआय याबाबतीत उद्योगवाढीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. आयमाचे आयपीपी निखिल पांचाळ यांनी आयमा टीमचे कौतुक केले. यावेळी जगदीश पाटील, रवि शामदासानी, रवि महादेवकर, अविनाश मराठे, श्रीलाल पांडे, हेमंत खोंड, रवींद्र झोपे, मनीष रावल, विनोद कुंभार, श्वेता चांडक, नागेश पिंगळे, शरद दातीर, कमलेश उशीर, वेदांत राठी आदी उपस्थित होते.
-------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV