
बीड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।
जुन्या वादातून महिलेच्या घरावर हल्ला करून वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर घरातील सामानाची नासधूस करून तब्बल ४ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. ही घटना आष्टी तालुक्यातील घाटपिंप्री येथे घडली. याप्रकरणी १४ जणांविरोधात अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
नंदाबाई भास्कर बायकर यांनी याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, जुन्या वादातून त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या घरासमोर असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.
घरातील सामानाची नासधूस करण्यात आली. यामध्ये ४ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली गेली. दहशत निर्माण केली गेली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis