पालघर येथे मुंबई विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत झुंझुनवाला व एनके महाविद्यालय अंतिम विजेते
पालघर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)मुंबई विद्यापीठाच्या झोन क्रमांक दोनच्या आंतर महाविद्यालयीन झोनल स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पुरुषांच्या गटात रामनारायण झुंझुनवाला महाविद्यालयाने अटीतटीच्या लढतीमध्ये ठाकूर महाविद्यालयाचा पराभव करत अंतिम विजेतेपद पट
पालघर येथे मुंबई विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत झुंझुनवाला व एनके महाविद्यालय अंतिम विजेते


पालघर, 20 नोव्हेंबर (हिं.स.)मुंबई विद्यापीठाच्या झोन क्रमांक दोनच्या आंतर महाविद्यालयीन झोनल स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये पुरुषांच्या गटात रामनारायण झुंझुनवाला महाविद्यालयाने अटीतटीच्या लढतीमध्ये ठाकूर महाविद्यालयाचा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले तर महिलांच्या गटात एन.के. कॉलेजने ठाकूर महाविद्यालयाचा पराभव करत अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या दोन दिवसाच्या स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉलचा जल्लोष महाविद्यालयाच्या परिसरामध्ये पहावयास मिळाला.

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात नुकताच या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये बांद्रापासून तलासरी पर्यंतच्या 57 पुरुष संघांनी व 31 महिला संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत 1000 पेक्षा जास्त खेळाडूंनी आपल्या खेळाचे कौशल्य दाखवले. उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाकूर महाविद्यालयाने दांडेकर महाविद्यालयाला पराभूत करीत अंतिम फेरी गाठली तसेच रामनारायण झुंजुनवाला कॉलेजने विवा महाविद्यालयाचा पराभव करत दुसरा उपांत्य सामन्यात बाजी मारत अंतिम फेरी गाठली होती. तर महिलांच्या गटात आर जे कॉलेज यांनी तृतीय क्रमांक पटकावला एम एल डी सी कॉलेजला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात संस्थेचे अध्यक्ष सीए सचिन कोरे कोषाध्यक्ष मंगेश पंडित सचिव सुधीर कुलकर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किरण सावे उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख डॉ. तानाजी पोळ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सीए सचिन कोरे यांनी आजच्या स्पर्धेत च्या युगात कष्ट आणि कौशल्याची सांगड घातल्यास विजय निश्चित आहे असे सांगितलं.

या स्पर्धेच्या आयोजनामध्ये डॉ. मनोज रेड्डी, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ, सौ. नीलम पाटील, सचिव, मुंबई उपनगर झोन क्रीडा समिती, आदित्य कुलकर्णी, बीओएस सदस्य, हरीश पारळकर, आंतरमहाविद्यालयीन सचिव यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेचे निटनिटके नियोजन व संयोजन करण्याचे काम महाविद्यालयाचे क्रीडा संचालक संतोष चुरी, संगीता ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक किरण थोरात यांनी यशस्वीपणे पार पाडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande