जळगाव - मॉर्निंग वॉकला गेलेल्या लिपिकाचा डंपरच्या धडकेत मृत्यू
जळगाव, 20 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्ह्यात एरंडोलमध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्याला डंपरने धडक दिली त्यात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शिवाजी रघुनाथ महाजन (रा. एरंडोल ह.मु.पारोळा) असं महसूल कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी महाजन हे एरंडोल येथील अष्टविनायक कॉलनी येथे वास्तव्यास होते. ते तहसील कार्यालयात लिपिक पदावर नोकरीला होते. दरम्यान आज सकाळी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असताना महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या ताब्यातील एका भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत शिवाजी महाजन यांचा मृत्यू अपघाताची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विच्छेदनासाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयतांच्या पश्चात परिवार आणि नातेवाईक असून, या घटनेने महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर

 rajesh pande