पाकिस्तानने सहा हजारापेक्षा जास्त अवैध अफगाण नागरिकांना पाठवले मायदेशी
इस्लामाबाद , 20 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये अवैध अफगाण नागरिकांवरील कारवाई सुरूच असून पाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने हि मोहीम अधिक गतीमान केली आहे. फक्त नोव्हेंबर महिन्यातच 6,000 पेक्षा जास्त लोकांना अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आले आहे. ग
पाकिस्तानने ६,००० पेक्षा जास्त अवैध अफगाण नागरिकांना अफगाणिस्तानात परत पाठवले


इस्लामाबाद , 20 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये अवैध अफगाण नागरिकांवरील कारवाई सुरूच असून पाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने हि मोहीम अधिक गतीमान केली आहे. फक्त नोव्हेंबर महिन्यातच 6,000 पेक्षा जास्त लोकांना अफगाणिस्तानात परत पाठवण्यात आले आहे. गुरुवारी दिलेल्या माहितीत पंजाब सरकारच्या मंत्र्यांनी सांगितले की, 13 कोटी लोकसंख्या असलेल्या प्रांतात अवैधपणे राहणाऱ्या अफगाण नागरिकांची माहिती पुरवणाऱ्या पाकिस्तान्यांना ‘रोख इनाम’ही देण्यात आले आहे.

बुखारी म्हणाले, “अवैधपणे राहणाऱ्या अफगाण नागरिकांची ओळख पटवणाऱ्यांना रोख बक्षिसे दिली जातील आणि प्रत्येक माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.” त्यांनी सांगितले की नोव्हेंबरमध्ये पंजाबमधून 6,220 अवैध अफगाण नागरिकांना अफगाणिस्तानात परत पाठवले गेले असून ही मोहीम प्रभावीपणे सुरूच राहील.ते म्हणाले, “पंजाबमधून अवैध अफगाण रहिवाशांना परत पाठवण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पुढे जात आहे आणि सरकार याबाबतच्या आपल्या शून्य-सहनशीलता धोरणाचे काटेकोर पालन करत आहे.” गेल्या महिन्यात पंजाब सरकारने प्रांतात अवैधपणे राहणाऱ्या सुमारे 22,000 अफगाण नागरिकांना परत पाठवले होते. त्यांनी सांगितले की परदेशी (अफगाण) नागरिकांना परत पाठवण्याच्या मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे.

पंजाब सरकारने गेल्या महिन्यात लाहोरपासून 325 किमी दूर मियांवाली येथील ‘कोट चांदना’ या शेवटच्या अफगाण निर्वासित छावणीचे अधिसूचित दर्जा रद्द केला होता. मात्र, खैबर पख्तूनख्वा प्रांतात अशा आणखी चार आणि बलुचिस्तानमध्ये दहा छावण्यांचे संचालन अद्याप सुरू आहे. तिसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी पंजाब सरकारने पाकिस्तानच्या अवैध विदेशी प्रत्यावर्तन योजना (आयएसआरपी) अंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर या काळात सुमारे 43,000 अफगाण नागरिकांना परत पाठवले होते.

सर्व अवैध रहिवाशांना पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. पंजाब सरकारकडे अद्याप प्रांतात 46 कार्यरत ताबा केंद्रे आहेत, ज्यात लाहोरमधील पाच केंद्रांचा समावेश आहे. या ताबा केंद्रांमध्ये अवैधपणे राहणाऱ्या अफगाण नागरिकांना ते अफगाणिस्तानात प्रवेशासाठी तोरखम सीमेपर्यंत पोहोचवले जात नाहीत तोपर्यंत ठेवले जाते.

संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित एजन्सीने सांगितले की पाकिस्तानमध्ये 35 लाखांहून अधिक अफगाण नागरिक राहतात, ज्यात सुमारे 7,00,000 लोकांचा समावेश आहे, जे 2021 मध्ये तालिबानच्या ताब्यानंतर पाकिस्तानात आले. संयुक्त राष्ट्रांनी अंदाज व्यक्त केला आहे की त्यांपैकी सुमारे निम्मे लोक बिनदस्तावेजांचे होते. शहबाज शरीफ सरकारने अफगाण नागरिकांना परत पाठवण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले की निर्वासितांची मोठी संख्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करत आहे आणि सार्वजनिक सेवांवर ताण वाढवत आहे, त्यामुळे त्यांना देशाबाहेर पाठवणे आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande