
मुंबई, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर पुन्हा एकदा मातृत्वाचा सुंदर प्रवास अनुभवण्यासाठी सज्ज झाली आहे. काही महिन्यांपासून तिच्या दुसऱ्या गर्भावस्थेबद्दल चर्चा सुरु होत्या आणि आता अखेर सोनमने स्वतःच ही खुशखबर आपल्या चाहत्यांशी शेअर केली आहे.
तिने इंस्टाग्रामवर गुलाबी आउटफिटमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करत केलेल्या स्टायलिश फोटोशूटद्वारे आपल्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची अधिकृत घोषणा केली. “माँ.” असे कॅप्शन देत तिने आपला आनंद शेअर केला आहे. चाहत्यांनी सोनमवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सोनम आणि आनंद आहूजा यांनी 2022 मध्ये पहिल्या मुलगा वायु चे स्वागत केले होते. आता 40 व्या वर्षी सोनम दुसऱ्यांदा आई होणार असून कपूर आणि आहूजा परिवारात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. 2014 च्या पहिल्या भेटीतून सुरू झालेली त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि मे 2018 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या आयुष्यात आणखी एक छोटंसं सुख येणार आहे.
सोनम ‘ब्लाइंड’ (2023) या चित्रपटात दिसली होती. पहिल्या बाळानंतर तिने थोडासा ब्रेक घेतला आणि लंडन–दिल्ली–मुंबई या ठिकाणांत ये-जा करत आपल्या फॅमिली टाइमचा आनंद घेत आहे. ‘सांवरिया’पासून ‘नीरजा’पर्यंतच्या सोनमच्या प्रवासाने प्रेक्षकांची मनं नेहमीच जिंकली आहेत. आता तिच्या नव्या अध्यायाची सुरुवातही तितकीच सुंदर ठरणार आहे. सोनमच्या आयुष्यात येणारा हा नवा आनंद तिच्या चाहत्यांसाठीही खास क्षण ठरत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर