सोने-चांदीचा भाव पुन्हा घसरला
जळगाव, 20 नोव्हेंबर (हिं.स.) जळगाव शहरातील सुवर्णपेठेत सोन्यासह चांदी दरात चढ उतार सुरू आहे. दोन्ही धातूंचे दर वाढले होते. मात्र आज गुरूवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दरात घट नोंदवली गेली. यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.दिवाळीनंतर
सोने-चांदीचा भाव पुन्हा घसरला


जळगाव, 20 नोव्हेंबर (हिं.स.) जळगाव शहरातील सुवर्णपेठेत सोन्यासह चांदी दरात चढ उतार सुरू आहे. दोन्ही धातूंचे दर वाढले होते. मात्र आज गुरूवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातुंच्या दरात घट नोंदवली गेली. यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.दिवाळीनंतर सध्या सर्वत्र लग्नसराईचा मोसम सुरू झाला आहे. या दरम्यान,सोन्याची मागणी वाढण्याची दाट शक्यता आहे. या वाढलेल्या मागणीचा सोन्याच्या भावाला आधार मिळेल. यामुळे, सध्या किंमतीत दबाव जाणवत असला तरी पुढील काही आठवड्यांत सोन्याचा दर पुन्हा वाढीस लागून अंदाजे १.३० लाखांच्या पातळीला स्पर्श करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जळगाव सराफ बाजारात आज गुरूवारी सकाळी बाजार उघडताच प्रति १० ग्रॅम ८२४ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २७ हजार १०२ रूपयांपर्यंत खाली आले. यापूर्वी काल बुधवारी दिवसभरात २०६० रूपयांची वाढ झाल्यांनतर सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २७ हजार ९२६ रूपयांपर्यंत पोहोचले होते. आज सोन्यापाठोपाठ चांदीत मोठी घसरण झाली आहे. काल बुधवारी तब्बल ४१२९ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६४ हजार ८०० रूपयांपर्यंत वधारली होती. मात्र आज सकाळी बाजार उघडताच २०६० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो एक लाख ६२ हजार ७४० रूपयांपर्यंत खाली आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande