सीएचएमई भोंसलातर्फे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा
नाशिक, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी अर्थात `सीएचएमई भोंसला` तर्फे उद्या(ता.२१) पासून भोसला मिलीटरी स्कूलच्या मैदानावर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. बाद फेरीने होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील सोळा स
सीएचएमई भोंसला` तर्फे आजपासून राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा


नाशिक, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी अर्थात `सीएचएमई भोंसला` तर्फे उद्या(ता.२१) पासून भोसला मिलीटरी स्कूलच्या मैदानावर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. बाद फेरीने होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील सोळा संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. `फुटबॉल` य़ा क्रीडाप्रकाराचे आकर्षण कायमच सर्वांना राहिले आहे, महाराष्ट्रात मराठी मातीशी नाते सांगणाऱ्या कबड्डी,खो-खो,कुस्तीसह फुटबॉल खेळांची देखील एक वेगळीच क्रेझ आहे. नाशिकमधील अनेक नावाजलेल्या फुटबॉल संघानी राज्य-राष्ट्रीयस्तवर चांगली कामगिरी करून नावलौकीक मिळवला होता. याच फुटबॉलमय़ वातावरणाची झलक पहायला मिळावी, या उद्देशाने `सीएचएमई भोसला`तर्फे या राज्यस्तर स्पर्धा होत आहे. उद्या(ता.२१) सकाळी नऊला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल, यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील.

बाद फेरीतून अंतिमसाठी संधी

या स्पर्धेत मुंबई,पुण्यासह विविध जिल्ह्यातील नावाजलेले सोळा संघ सहभागी झाले आहे. त्यात यजमान भोसला,नाशिक युनाइटेड, एसटू गांधीनगर या स्थानिक संघासह आरके औरंगाबाद, गुरुरंग स्पोर्टस अँकेडमी, न्युसा, डीएफसी, रायझिंग स्पोर्टस्, आयसीएल मुंबई, ठाणे सीटी पोलिस, अनबिटेबल,सेन्ट्रेललाईट आरएफसी मुंबई,डीके.फॉर्मा एफसी, व्हेव एफसी मुंबई हे संघ सहभागी होणार आहे, सर्व संघादरम्यान अटीतटीचे भोसला मिलिटरी स्कूल(मुलांचे मैदान) आणि मुलींच्या मैदानावर हे सामने होतील, त्यातून बाद फेरीत प्रवेश करणाऱ्या संघात चुरशीच्या लढती होऊन रविवारी(ता.२३) ला अंतिम सामना होईल. पहिल्या दिवशी ८,दुसऱ्या दिवशी चार आणि तिसऱ्या दिवशी तीन सामने होतील. सकाळ सत्रात दहा ते दुपारी एक, दुपार सत्रात ३ ते सहा यावेळेत सामने होतील. या स्पर्धेसाठी नाशिक फुटबॉल असोसिएशनचे सहकार्य लाभत असून पंच,परिक्षक हे उपलब्ध असतील. जास्तीत जास्त नाशिककरांनी हे सामने पाहण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सीएचएमई भोंसला तर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande