सुवर्ण कारागिराचे बंद घर फोडून १५ लाखांचे दागिने लंपास
जळगाव , 20 नोव्हेंबर, (हिं.स.) जळगाव शहरात सोन्याचे दागिने बनवणाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख ५० हजार रुपयांसह १५ लाख २० हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी शहरातील गीताईनगरात उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी
सुवर्ण कारागिराचे बंद घर फोडून १५ लाखांचे दागिने लंपास


जळगाव , 20 नोव्हेंबर, (हिं.स.) जळगाव शहरात सोन्याचे दागिने बनवणाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख ५० हजार रुपयांसह १५ लाख २० हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने लांबविले. ही घटना १९ नोव्हेंबर रोजी शहरातील गीताईनगरात उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव शहरामधील गीताई नगरातील मालचंद गौरीशंकर सोनी हे नातेवाइकाचे निधन झाल्याने कुटुंबासह राजस्थानातील गावी गेले होते. ते पाहून चोरट्यांनी १८ नोव्हेंबरच्या सकाळपासून ते १९ नोव्हेंबरच्या पहाटे ७.२५ वाजेच्या दरम्यान सोनी यांचे घर फोडले. ही घटना शेजारी अशोक सोनी यांच्या लक्षात येताच, त्यांनी लागलीच मालचंद सोनी यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

मालचंद यांनी बुधवारी सकाळी साडेसात वाजता चुलत पुतण्या नरेंद्र सोनी याला चोरीबाबत माहिती दिली. त्यानंतर नरेंद्र व इतर नातेवाइकांसह गीताईनगर गाठले. तेव्हा घराच्या बाहेरील सेफ्टी डोअरचा कोयंडा कापलेला तसेच आतील लाकडी दरवाजाचाही कोयंडा तोडलेला दिसला. वरच्या मजल्यावरील मागच्या रूमचा दरवाजा तोडलेला दिसून आला. ५५ ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या, १२ ग्रॅमची चेन, १० ग्रॅमचे ब्रेसलेट, १५ ग्रॅमचे झुमके, ४ ग्रॅमचे झुमके, ४ ग्रॅमची चेन, ५ ग्रॅमची इअररिंग, २ ग्रॅमची इअररिंग, २ ग्रॅमचे पेंडल, प्रत्येकी ८ ग्रॅम, ७ ग्रॅम, ५ ग्रॅम, ४ ग्रॅम, ३ ग्रॅमच्या दोन, २ ग्रॅम व१ ग्रॅमची अंगठी, ३ ग्रॅमची फुली, ५०० ग्रॅम चांदीचे शिक्के, २०० ग्रॅमचे चांदीचे जोडवे व ५० हजारांची रोकड असा १५ लाख ७० हजारांचा ऐवज चोरी झाला. नरेंद्र सोनी यांनी फिर्याद दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande