
पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)अमली पदार्थांचे सेवन आणि वाहतूक नियमांच्या उल्लंघनासह विद्यार्थ्यांमधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलिस आता शिक्षण संस्थांबरोबर पुढील वर्षभर काम करणार आहेत. त्या अंतर्गत केल्या जाणाऱ्या उपक्रमांचा आराखडा तयार करण्यात आला असून, या निमित्ताने शिक्षण संस्थांमध्ये पोलिसांचा वावर राहणार आहे. त्याचा आराखडा पोलिसांनी केला असून त्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे शहर पोलिसांकडून ‘शिक्षणात सुरक्षित क्षितिजे’ या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां . ब. मुजुमदार, ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन, ‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठा’च्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त पंकज देशमुख आणि अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यावेळी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु