बांगलादेशात ५.५ तीव्रतेचा भूकंप; तिघांचा मृत्यू, 200 हुन अधिक जखमी
ढाका, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये शुक्रवारी सकाळी ५.५ तीव्रतेचा भूकंप झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक जण जखमी झाले. या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की ढाका येथील काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. तर बांगलादेशमध्ये स
बांगलादेशात ५.५ तीव्रतेचा भूकंप;  3 जणांचा मृत्यू तर 200 हुन अधिक जखमी


ढाका, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशमध्ये शुक्रवारी सकाळी ५.५ तीव्रतेचा भूकंप झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक जण जखमी झाले. या भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की ढाका येथील काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. तर बांगलादेशमध्ये सुरू असलेला बांगलादेश-आयर्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनाही थांबवण्यात आला.

अमेरिकेच्या युएसजीएस या संस्थेनुसार, या भूकंपाचे केंद्र बांग्लादेशातील नरसिंगडीजवळ होते. या भूकंपामुळे पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. भूकंपाच्या वेळी गाझीपूरमधील श्रीपूर येथे एका बहुमजली इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यात १५० हून अधिक कामगार जखमी झाले.ही घटना डेनिमेक नावाच्या कापड कारखान्यात घडली. जखमींना श्रीपूर उपजिल्हा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

मीरपूरमध्ये सुरु असलेल्या बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान भूकंप आला आणि सामना थांबवावा लागला. दोन बॉल खेळून झाल्यावर अचानक जमीन हलू लागली. काही वेळा खेळाडूंना समजले नाही की काय झाले, पण जसे समजले, सर्व जण चिंताग्रस्त झाले. ड्रेसिंग रूममध्ये बसलेले खेळाडू बाहेर पळून गेले आणि बाउंड्री लाइनजवळ उभे राहिले. तसेच अनेक प्रेक्षक स्टेडियम सोडून बाहेर गेले. खेळाडू आणि अंपायर्स सुद्धा पिचजवळ उभे राहिले. काही वेळेनंतर सामना पुन्हा सुरू झाला.

दरम्यान, कोलकाता तसेच उत्तर आणि दक्षिण बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी सकाळी अचानक जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. स्थानिकांनी सांगितले की हा भूकंप सुमारे २० सेकंद चालला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी असून या भूकंपाचे केंद्र बांगलादेशमध्ये होते. यामध्ये आतापर्यंत कोणतेही नुकसान झालेले नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande