
ब्राझिलिया, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। ब्राझीलच्या बेलेम येथे गुरुवारी झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सीओपी 30 हवामान परिषदेच्या मुख्य ठिकाणी आग लागली, ज्यामध्ये किमान 21 जण जखमी झाले. आगीच्या वेळी भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव भारतीय शिष्टमंडळासोबत उपस्थित होते. तथापि, ते आणि इतर अधिकारी सुरक्षितपणे कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडले. यानंतर परिसर तात्काळ रिकामा करण्यात आला आणि चर्चा थांबवावी लागली.
माहितीनुसार, हि आग स्थानिक वेळेनुसार दुपारी २:०० वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री १०:३० वाजता) एका कन्व्हेन्शन हॉलमधील मंडपात लागली. घटनेच्या वेळी १९० हून अधिक देशांचे ५०,००० हून अधिक राजनयिक, पत्रकार आणि कार्यकर्ते मंडपात उपस्थित होते. या घटनेत २१ जण जखमी झाले आहेत.यापैकी 19 जण धूर श्वसनामुळे आणि 2 जण घबराटीमुळे दुखापतग्रस्त झाले. सुमारे सहा मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली, असे कार्यक्रमाचे आयोजक यूएन सीओपी 30 प्रेसिडेन्सी आणि यूएनएफसीसीसी यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. स्थानिक अग्निशमन विभागाने सांगितले की आग इलेक्ट्रॉनिक उपकरणामुळे (कदाचित मायक्रोवेव्हमुळे) लागली असावी. तथापि, इतर कारणांचा तपास केला जात आहे.
आग विझल्यानंतर प्रभावित क्षेत्र सील करून मोठ्या शीटने झाकण्यात आले आणि सहभागींची पासपोर्टसह आवश्यक कागदपत्रे परत देण्यात आली. प्लेनरी सत्र शुक्रवारीपर्यंत स्थगित करण्यात आले.यूएन सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की आग पूर्णपणे नियंत्रणात आहे, परंतु सुरक्षा तपासणी सुरू असल्याने प्रवेशाला परवानगी नाही. सर्व 13 धूरग्रस्तांना घटनास्थळीच उपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या परिषदेत 190 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी आहेत. सीओपी 30 हवामान परिषद 10 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत अमेझॉन प्रदेशातील बेलेम शहरात आयोजित केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode