रस्त्यावर वाढदिवस साजरा; लातूर पोलिसांनी केली कठोर कारवाई
लातूर, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। लातूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लातूर पोलिसांकडून विशेष गस्त वाढविण्यात आली आहे. याच अनुषंगाने वाढदिवसाचा बहाणा करून मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात आरडाओरडा, फटाके फोडणे,तसेच नागरिकांना त्
गोंधळ–गडबड करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई.


लातूर, 21 नोव्हेंबर, (हिं.स.)। लातूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लातूर पोलिसांकडून विशेष गस्त वाढविण्यात आली आहे. याच अनुषंगाने वाढदिवसाचा बहाणा करून मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात आरडाओरडा, फटाके फोडणे,तसेच नागरिकांना त्रास देत गोंधळ निर्माण करणाऱ्या युवकांच्या समूहावर लातूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.

लातूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते पीव्हीआर कडे जाणाऱ्या रिंग रोड वर काही युवकांनी मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी सार्वजनिक मार्गावर अडथळा निर्माण करत गोंधळ घातला, संगीत वाजवून, फटाके फोडून, आरडाओरडा व गडबड गोंधळ करीत असताना गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पेट्रोलिंग पथकाने संबंधित युवकांकडून होणारा गोंधळ तात्काळ बंद केला. वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली संबंधितांनी रस्ता अडवून वाहतुकीत अडथळा निर्माण करणे,सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा व गडबड करणे नागरिकांना त्रास होईल अशी वर्तनशैली राखणे अशी कृत्ये करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल युवकांविरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी कडून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलिस अमलदार मोहन सुरवसे, राहुल कांबळे यांनी केली आहे.

लातूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन येते की—वाढदिवस,पार्टी किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या नावाखाली सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ, डान्स पार्टी, साऊंड लावणे, फटाके फोडणे, रस्ता बंद करणे अशी कृत्ये कायद्याने दंडनीय आहेत.सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यास मनाई आहे. नागरिकांनी अशा प्रकारची गडबड व बेकायदेशीर कृत्ये केल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष ०२३८२_२४२२९६ /११२ वर संपर्क करावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande