लावा अग्नी 4 भारतात लाँच
मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावाने आपला सर्वात प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन लावा अग्नी 4 अधिकृतपणे भारतात लाँच केला आहे. हे मॉडेल गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आलेल्या लावा अग्नी 3 ची सुधारित आवृत्ती असून यामध्ये अनेक नवीन आणि
Lava Agni 4


Lava Agni 4


मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय स्मार्टफोन ब्रँड लावाने आपला सर्वात प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन लावा अग्नी 4 अधिकृतपणे भारतात लाँच केला आहे. हे मॉडेल गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आलेल्या लावा अग्नी 3 ची सुधारित आवृत्ती असून यामध्ये अनेक नवीन आणि दमदार फीचर्स जोडण्यात आली आहेत. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये 6.67 इंचाचा फ्लॅट 120 हर्ट्झ AMOLED डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंसिटी 8350 प्रोसेसर, 66 वॉट फास्ट चार्जिंग, 5,000 mAh बॅटरी आणि स्टॉक Android 15 यांसारखी उच्च दर्जाची वैशिष्ट्ये दिली आहेत.

या फोनमध्ये 50 मेगापिक्सल OIS सह ड्युअल रियर कॅमेरा आणि 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला असून 4K 60fps व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 8GB LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 4.0 स्टोरेजसह हा फोन बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फोनचा AnTuTu v10 स्कोर 14 लाखांपेक्षा जास्त आहे आणि उष्णता नियंत्रणासाठी VC लिक्विड कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

लावा अग्नी 4 ची भारतातील किंमत फक्त 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात इंट्रोडक्टरी ऑफर्स आणि कार्ड डिस्काउंटचा समावेश आहे. फोनचा एकच व्हेरिएंट उपलब्ध असेल आणि — फॅंटम ब्लॅक आणि ल्यूनर मिस्ट या दोन आकर्षक रंगांमध्ये हा फोन सादर करण्यात आला आहे.

25 नोव्हेंबर 2025 पासून दुपारी 12 वाजल्यापासून Amazon.in वर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बिल्ड क्वालिटीच्या दृष्टीने फोनला अ‍ॅल्युमिनियम अलॉय फ्रेम, IP64 रेटिंग आणि सुपर अँटी-ड्रॉप डायमंड फ्रेम देण्यात आली आहे. Vayu AI नावाचा स्मार्ट AI असिस्टंट, 100+ शॉर्टकटसह कस्टमायझेबल Action Key, IR ब्लास्टर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट, फेस अनलॉक आणि अँटी-थेफ्ट अलार्म यांसारख्या अतिरिक्त सुविधा देखील उपलब्ध केल्या आहेत. 5G, Wi-Fi 6E, Bluetooth 5.4 आणि USB 3.2 Type-C सारखे आधुनिक कनेक्टिव्हिटी पर्यायही फोनमध्ये देण्यात आले आहेत.

25,000 रुपयांखालील किंमत विभागात 120Hz AMOLED डिस्प्ले, UFS 4.0 स्टोरेज, 66W फास्ट चार्जिंग आणि स्टॉक Android 15 सोबत 3 मोठे Android अपग्रेड्स आणि 4 वर्षे सिक्युरिटी अपडेट्स देणारा हा पहिलाच भारतीय स्मार्टफोन असून, तज्ज्ञांच्या मते लावा अग्नी 4 हा देशीय ब्रँडकडून आतापर्यंतचा सर्वात प्रभावी आणि शक्तीशाली स्मार्टफोन मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande