पियाजियोची दोन नवी कार्गो थ्री-व्हीलर्स बाजारात
मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। इटालियन वाहन निर्माता कंपनी पियाजियो व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडनं (PVPL) भारतात डिझेल कार्गो थ्री-व्हीलर सेगमेंटमध्ये Ape Xtra Bada 700 आणि Ape Xtra 600 ही दोन नवी दमदार मॉडेल्स लाँच केली आहेत. या दोन्ही वाहनांमुळं ल
Piaggio launches two new cargo


मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। इटालियन वाहन निर्माता कंपनी पियाजियो व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडनं (PVPL) भारतात डिझेल कार्गो थ्री-व्हीलर सेगमेंटमध्ये Ape Xtra Bada 700 आणि Ape Xtra 600 ही दोन नवी दमदार मॉडेल्स लाँच केली आहेत. या दोन्ही वाहनांमुळं लास्ट-माइल कार्गो मोबिलिटी क्षेत्रातील कंपनीची आघाडी आणखी मजबूत होणार असून छोटे व्यावसायिक, डिलिव्हरी ऑपरेटर्स आणि लॉजिस्टिक्स व्यवसायांना अधिक उत्पन्न संधी उपलब्ध होणार आहेत.

Ape Xtra Bada 700 हे पूर्णपणे नव्या प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलं असून यात 700 DI डिझेल इंजिन, 750 किलोची पेलोड क्षमता (सेगमेंटमधील सर्वाधिक), 7 फूटांचा इंडस्ट्रीतील पहिला कार्गो डेक, 12 इंच रेडियल टायर्स आणि 3.5 इंच LCD डिजिटल स्पीडोमीटर क्लस्टर देण्यात आले आहे. सुधारित चेसिस-सस्पेन्शन, नव्या मजबूत डिझाइनचा लूक, spacious आरामदायी केबिन आणि पर्यायी रिव्हर्स सेन्सर यामुळे वाहतूक सोयीसुविधांचा दर्जा उंचावला आहे. 5 वर्षांच्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक वॉरंटीसह हे मॉडेल 3.45 लाखांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किमतीत, नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध होणार आहे. अपेक्षेपेक्षा जास्त भारवाहकता आणि दमदार परफॉर्मन्समुळे हे मॉडेल व्यावसायिक वाहतुकीत मोठा बदल घडवेल, असा कंपनीचा दावा आहे.

दुसरीकडे Ape Xtra 600 मध्ये पियाजियोनं स्वतः विकसित केलेलं 600 DI डिझेल इंजिन बसवले आहे. उत्तम मायलेज, उत्कृष्ट चढाई क्षमता आणि श्रेणीतील उत्कृष्ट पेलोड क्षमतेसह हे मॉडेल शहरांतर्गत व अर्ध-शहरी लॉजिस्टिक्ससाठी आदर्श ठरणार आहे. सुधारित ड्रायव्हर कम्फर्ट, टिकाऊ बांधणी आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे दैनंदिन वापरात खर्च बचतीसोबत उत्तम उत्पादकता मिळणार आहे. बजेट-फ्रेंडली पर्याय म्हणून उपलब्ध असलेल्या या मॉडेलची प्रारंभिक किंमत 2.88 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

दोन्ही मॉडेल्स देशभरातील पियाजियो डीलरशिपवर नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध होतील. Ape ब्रँडच्या यशस्वी परंपरेला पुढे नेत कंपनी बाजारपेठेतील हिस्सेदारी आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. नव्या वाहनांमुळे वितरण व्यवसाय करणाऱ्यांना अधिक नफा आणि सुधारित ऑपरेशनल कार्यक्षमता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande