

मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतातील स्मार्टफोन बाजारात रियलमीने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन रियलमी जीटी 8 प्रो लाँच केला आहे. हा फोन अत्याधुनिक स्नॅपड्रॅगन ८ एलिट जनरेशन ५ (3nm) चिपसेटसह येणारा देशातील वनप्लस 15 नंतरचा दुसरा स्मार्टफोन आहे. शक्तिशाली परफॉर्मन्ससोबतच कॅमेरा सेगमेंटमध्येही हा फोन मोठी झेप घेतो असून Ricoh GR Tuned Triple Camera System ही त्याची खासियत आहे. यासोबतच Dream Edition व्हेरियंटही सादर करण्यात आला असून त्याच्या मागील बाजूस टेक्स्चर्ड Aston Martin लोगो देण्यात आला आहे.
Realme GT 8 Pro ची भारतातील सुरुवातीची किंमत 72,999 रुपये ठेवण्यात आली आहे, जी 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियंटसाठी आहे. तसेच 16GB RAM + 512GB व्हेरियंटची किंमत 78,999 रुपये असून Dream Edition (16GB + 512GB) ची किंमत 79,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा फोन Diary White आणि Urban Blue या दोन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
फोनची विक्री 25 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्ट आणि Realme India वेबसाइटवर सुरू होणार आहे. पहिल्या खरेदीदारांसाठी 29 नोव्हेंबरपर्यंत विशेष ऑफर उपलब्ध असून सामान्य व्हेरियंटवर 5,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट, फ्री डेको सेट आणि 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय दिला जाईल. Dream Edition वर डिस्काउंट नसला तरी 12 महिन्यांचा ईएमआय पर्याय उपलब्ध आहे.
या फोनमध्ये 6.79 इंच QHD+ 144Hz BOE Q10 AMOLED डिस्प्ले, Adreno 840 GPU, LPDDR5X RAM, UFS 4.1 स्टोरेज, आणि 7,000 mm² व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टीम देण्यात आली आहे. कॅमेरामध्ये 200 MP टेलिफोटो लेन्स (120x डिजिटल झूम), 50 MP Sony IMX906 मुख्य कॅमेरा OIS सह, आणि 50 MP अल्ट्रावाइड लेन्स आहे. फ्रंटला 32 MP सेल्फी कॅमेरा मिळतो. बॅटरी 7000mAh आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आला आहे.
नवीन Android 16 वर चालणारा हा फोन गेमिंग, फोटोग्राफी आणि हेवी परफॉर्मन्स वापरकर्त्यांसाठी खास डिझाइन करण्यात आला आहे. शक्तिशाली चिपसेट आणि प्रगत कॅमेरा सिस्टममुळे रियलमी जीटी 8 प्रो हा सध्या बाजारातील सर्वात प्रभावी आणि पॉवरफुल स्मार्टफोनपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule