सोलापूर - ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
सोलापूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। शहरातील गाडेगाव रोड, म्हाडा कॉलनी येथे राहणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असून अद्याप बेशुद्ध अवस्थेत अतिदक्षता विभागात शहरातील खासगी रुग्णालय
सोलापूर - ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न


सोलापूर, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। शहरातील गाडेगाव रोड, म्हाडा कॉलनी येथे राहणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला असून अद्याप बेशुद्ध अवस्थेत अतिदक्षता विभागात शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटनेने अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने पंचायत समितीमध्ये खळबळ उडाली आहे.

प्रकाश बावीस्कर (वय-४९) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव आहे बार्शीतून बदली होऊन सध्या अंबड (ता. माढा) येथे कार्यरत आहेत. त्यांचे पाठीमागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून आत्महत्येची घटना घडली.पत्नी, मुलगी घरी असताना पती घराच्या दुसऱ्या खोलीमध्ये होते. त्यावेळी पत्नीला एकदम खुर्ची पडल्याचा आवाज येताच पत्नीने खाेलीत जाऊन पाहिले त्यावेळी रुमच्या पंख्याला पतीने दोरीने गळफास घेतल्याचे दिसले त्वरीत उचलुन धरले आणि आरडा-ओरड केली. त्यावेळी मुलगी आणि शेजाऱ्यांनी खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande