टीव्ही आजही घराघरातील संस्कृती, नाती आणि कथा जपणारे प्रभावी माध्यम
मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। झी मराठी गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वात जिव्हाळ्याचा, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी मनोरंजनाही वाहिनी आहे. विविध मालिका, रिअ‍ॅलिटी शो, सांस्कृतिक सोहळे आणि सामाजिक उपक्रमांद्वारे राज
टीव्ही आजही घराघरातील संस्कृती, नाती आणि कथा जपणारे प्रभावी माध्यम


मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। झी मराठी गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वात जिव्हाळ्याचा, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी मनोरंजनाही वाहिनी आहे. विविध मालिका, रिअ‍ॅलिटी शो, सांस्कृतिक सोहळे आणि सामाजिक उपक्रमांद्वारे राज्यातील लाखो प्रेक्षकांशी झी मराठीची नाळ जोडलेली आहे. जागतिक टीव्ही दिनानिमित्त झी मराठीने आजच्या डिजिटल-फर्स्ट काळातही टेलिव्हिजनचे अद्याप टिकून असलेले महत्त्व, त्याची सांस्कृतिक ताकद आणि येणाऱ्या काळातील नवोन्मेष याबाबत आपले विचार जाहीर केले.

झी मराठीच्या, चीफ चॅनेल ऑफिसर - व्ही. आर. हेमा म्हणतात “आजच्या डिजिटल-फर्स्ट जगात ‘जागतिक टीव्ही दिन’ साजरा करताना मला नेहमी जाणवतं की टेलिव्हिजन हे माध्यम फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, ते आजही कुटुंबाला एकत्र आणण्याची आणि सामूहिक अनुभवांची नाळ जोडतं… आमचं ध्येय टीव्हीला केवळ स्क्रीन नाही तर घराचा सदस्य वाटेल असं करणं आहे. सामाजिक एकता वाढवण्यात टीव्हीचे योगदान मला अत्यंत महत्त्वाचे वाटते… ‘मी मराठी. झी मराठी’ ही भावना आमच्या प्रत्येक कार्यक्रमात जाणवते… सामाजिक संदेश, जागरूकता मोहिमा आम्ही ‘कमळी’ , ‘तारिणी’ सारख्या प्रेरणादायी कथा मधून जबाबदारीपूर्ण अतिशय प्रभावीपणे सांभाळल्या आहेत. डिजिटल आणि ऑन-डिमांड प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरामुळे टेलिव्हिजनची भूमिका बदलली असली तरी ती कमी झालेली नाही उलट अधिक ताकदीने विकसित होत आहे… पुढील काळात मल्टी-स्क्रीन अनुभव ही टीव्हीची नैसर्गिक प्रगती असेल. झी मराठीच्या २६ वर्षांच्या प्रवासात आम्ही अनेक ‘फर्स्ट-इन्-इंडस्ट्री’ उपक्रम केले आहेत आणि पुढील काळात त्याच नवोन्मेषी दृष्टिकोनाला अधिक विस्तार देण्याचे आमचे लक्ष्य आहे. उदाहरणार्थ, ‘कमळी’ या कार्यक्रमाचा प्रोमो न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित होणं हा जागतिक स्तरावर मराठी कंटेन्टची ओळख निर्माण करणारा ऐतिहासिक उपक्रम होता. याचप्रमाणे, पुढील काळात आम्ही शिक्षण, समुदाय आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन या तिन्ही क्षेत्रांमध्ये अधिक मजबूत पावले उचलण्याच्या तयारीत आहोत. जस की आमच्या मालिकांमधून केलेल्या शैक्षणिक उपक्रमांना लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. ‘कमळी’ च्या माध्यमातून दुर्गम गावांतील मुलींना सायकलींचं वाटप करणं असो, किंवा ‘लक्ष्मी निवास’ मधील लक्ष्मी या पात्राने वंचित विद्यार्थ्यांना वह्या वाटप करणे हे उपक्रम प्रेक्षकांच्या भावनांशी जुळले आणि झी मराठीची ही लाडकी पात्रे फक्त आपल्या अभिनयानींच नाही तर अश्या उपक्रमांमुळे ही समाजात आदर्श निर्माण करत आहेत. याशिवाय, समुदायाशी प्रत्यक्ष संवाद साधणारे अनेक उपक्रम आम्ही सातत्याने करत आलो आहोत आणि ते पुढे वाढवण्याचा आमचा मानस आहे. ‘नव दाम्पत्यांची मंगळागौर’ , ‘आम्ही सारे खवये जोडीचा मामला’, ‘गोविंदा आला रे’ आणि ‘मालिकांचा महासंगम’, अशा कार्यक्रमांनी लोकांमध्ये एक वेगळा आनंद, सहभाग आणि जवळीक निर्माण केली. समुदायाशी असलेली ही नाळ पुढील वर्षांत आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही विविध सांस्कृतिक, उत्सवी आणि कौटुंबिक कार्यक्रमांची आखणी करत आहोत.समुदायाशी संवाद साधणारे अनेक उपक्रम आम्ही सातत्याने करत आलो आहोत. ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांमध्ये संतुलन साधणे ही आमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि रणनीतीपूर्ण प्रक्रिया आहे… कथा, पात्र, भाषा आणि लोकेशनमध्ये खरी मराठी ओळख कायम ठेवतो. Gen Z प्रेक्षकांची आवड, गती आणि अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. सोशल मीडियावर इंटरऍक्टिव्ह कंटेन्ट, रील्स, डिजिटल बिहाइंड-द-सीन्स… भविष्यात आमची दृष्टी स्पष्ट आहे – ‘मी मराठी. झी मराठी’ ही ओळख अधिक आधुनिक, इनोव्हेटिव्ह पद्धतीने सादर करण.”

तेव्हा बघत राहा सदैव तुमची झी मराठी वाहिनी

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande