शाओमी हायपरओएस 3 लवकरच भारतात होणार उपलब्ध
मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। शाओमीनं अधिकृतपणे जाहीर केलं आहे की अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3 अपडेट भारतात लवकरच उपलब्ध होणार आहे. कंपनीनं आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरून घोषणा करताना या अपडेटला “जलद, हुशार आणि स्मूथ” असं संबोधलं असून शाओमी, रेड
Xiaomi HyperOS 3


मुंबई, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। शाओमीनं अधिकृतपणे जाहीर केलं आहे की अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3 अपडेट भारतात लवकरच उपलब्ध होणार आहे. कंपनीनं आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरून घोषणा करताना या अपडेटला “जलद, हुशार आणि स्मूथ” असं संबोधलं असून शाओमी, रेडमी आणि पोको वापरकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हायपरओएस 3 हे शाओमीचं नवीनतम कस्टम स्किन असून सप्टेंबरमध्ये चीनमध्ये प्रथम लाँच करण्यात आलं. शाओमी 17 मालिका हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, ज्यावर हे सॉफ्टवेअर प्री-इन्स्टॉल्ड आलं आहे.

या अपडेटमधील सर्वांत महत्त्वाचं फीचर म्हणजे हायपरआयलंड, जे अ‍ॅपलच्या डायनॅमिक आयलंडसारखं असून ड्युअल लेआऊटमध्ये चार्जिंग स्पीड, लाईव्ह अ‍ॅक्टिव्हिटी, म्यूझिक कंट्रोल, कॉल माहिती आणि शेड्यूल थेट स्क्रीनच्या वर दिसतात. तसेच अ‍ॅप सोडल्याशिवाय फ्लोटिंग विंडोमधून काम सुरू ठेवता येतं. हायपरएआय (HyperAI) तंत्रज्ञानामुळे स्मार्ट स्क्रीन रेकग्निशन, डीपथिंक मोड, टोन व शैली बदलणारं ऑटो लेखन साधन, एआय स्पीच रेकग्निशन, रिअल-टाइम ट्रान्स्क्रिप्शन, सारांश, एआय सर्च, फोटो वर्गीकरण, डायनॅमिक वॉलपेपर आणि सिनेमॅटिक लॉकस्क्रीन यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात.

भारतामध्ये या अपडेटचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार असून शाओमी 15 मालिका, मिक्स फ्लिप, रेडमी नोट 14 मालिका, पोको एफ7, पोको एक्स7 मालिकेला सर्वप्रथम अपडेट मिळेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शाओमी 14 मालिका, रेडमी नोट 13 प्रो, रेडमी 15, रेडमी 14सी या डिव्हाइसेसना अपडेट मिळणार आहे. तर 2026 च्या मार्चपर्यंत शाओमी 13 मालिका आणि रेडमी पॅड प्रो 5जी यांसारख्या जुन्या डिव्हाइसेसना अपडेट देण्यात येणार आहे.

सध्या जागतिक बाजारात शाओमी 15 मालिका, 15T मालिका, पोको F7 अल्ट्रा, शाओमी Pad 7 मालिका, रेडमी नोट 14 प्रो+ 5G, रेडमी नोट 14 प्रो 5G, पोको X7 प्रो, पोको X7, पोको M7 4G आणि रेडमी 15 4G यांसारख्या डिव्हाइसेसना स्थिर अपडेट प्रदान करण्यात आलं आहे. कंपनीनं नवीन आणि फ्लॅगशिप मॉडेल्सना प्राधान्य दिलं असून 2022–2023 च्या स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 आणि स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 असलेल्या डिव्हाइसेसचा क्रमाक्रमाने समावेश सुरू झाला आहे.

या अपडेटमुळे शाओमी, रेडमी आणि पोको फोन अधिक वेगवान, स्थिर व एआय-सक्षम होणार असून गेमिंग आणि परफॉर्मन्सप्रेमींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कंपनीनं भारतातील पूर्ण डिव्हाइस लिस्ट लवकरच जाहीर केली जाईल, असं स्पष्ट केलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande