नवी दिल्लीत 24 ते 26 नोव्हेंबर सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलनाचे आयोजन
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर (हिं.स.) - कृषी शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, धोरणकर्ते आणि विकास विषयक भागीदार यांचा जगातील सर्वात मोठा वैश्विक मेळावा असलेले सहावे आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलन (आयएसी-2025) येथे दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली
नवी दिल्लीत 24 ते 26 नोव्हेंबर सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलनाचे आयोजन


नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर (हिं.स.) -

कृषी शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, धोरणकर्ते आणि विकास विषयक भागीदार यांचा जगातील सर्वात मोठा वैश्विक मेळावा असलेले सहावे आंतरराष्ट्रीय कृषिशास्त्र संमेलन (आयएसी-2025) येथे दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्लीत, पुसा येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (एनपीएल) येथे आयोजित करण्यात आले आहे.

भारतीय कृषिशास्त्र संस्थेतर्फे (आयएसए) आयोजित करण्यात आलेला हा तीन दिवसीय कार्यक्रम, भारतीय कृषी संशोधन मंडळ (आयसीएआर), आयसीएआर-भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय), राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमी (एनएएएस) आणि कृषी विज्ञानाच्या प्रगतीसाठी नेमलेला विश्वस्त निधी (टीएएएस) यांच्या सहयोगासह पार पडणार आहे.

सदर संमेलनाची ‘स्मार्ट कृषी खाद्यान्न यंत्रणा आणि पर्यावरण संरक्षणासाठी कृषिशास्त्राची पुनर्परिकल्पना’ ही संकल्पना अधिक उत्पादक, हवामान बदलाप्रती लवचिक, पर्यावरण दृष्ट्या टिकाऊ आणि पोषणदृष्ट्या सुरक्षित असलेल्या भविष्य-सज्ज कृषी प्रणाली निर्माण करण्याची तातडीची गरज अधोरेखित करते.

एफएओ, सीआयएमएमवायटी, आयसीआरआयएसएटी, आयआरआरआय आणि आयडीएफसी यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांतील तज्ञांसह कृषी विद्यापीठांचे उपकुलगुरु, आयसीएआरचे उपमहाव्यवस्थापक, उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी तसेच आघाडीचे कृषी-व्यापार नवोन्मेषकर्ते देखील या संमेलनात सहभागी होतील.

अपेक्षित 1,000 जागतिक प्रतिनिधींसह, हा कार्यक्रम जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक विचारमंथनासाठी वैशिष्ट्यपूर्ण मंच म्हणून काम करेल. या संमेलनाच्या काळात, विशेष सत्रे, विषयाधारित परिसंवाद, प्रमुख व्याख्याने, पोस्टर सादरीकरणे, एक प्रदर्शन आणि युवा शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी समर्पित परिषद इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

हवामानाच्या संदर्भात स्मार्ट, लवचिक आणि शाश्वत कृषी प्रणालींच्या क्षेत्रात भारत हा जागतिक नेता म्हणून उदयाला येत आहे. उपरोल्लेखित संमेलन खालील उपक्रमांसह इतर अनेक प्रमुख सरकारी उपक्रमांच्या यशस्वी कामगिरीची माहिती सादर करेल:

• शाश्वत शेतीसाठी राष्ट्रीय अभियान (एनएमएसए)

• पंतप्रधान कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय)

• मृदा आरोग्य कार्ड योजना

• पंतप्रधान-प्रणाम (धरतीमाता कार्यक्रम)

• डिजिटल कृषी अभियान (डीएएम)

• नैसर्गिक शेतीसाठीचे राष्ट्रीय अभियान

• पंतप्रधान किसान योजना

पार्श्वभूमी

वर्ष 1955 मध्ये स्थापन झालेली भारतीय कृषिशास्त्र संस्था ही भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात प्रमुख शास्त्रीय संघटना आहे. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून ही संस्था भारतीय कृषिशास्त्र नियतकालिकाचे प्रकाशित करते तसेच कृषिशास्त्रातील संशोधन, शिक्षण आणि विस्तार यांतील प्रगतीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande