
बीड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी मटका जुगार आड्यावर छापेमारी केली.मटका बुक्या सुरू ठेवल्याने पोलिसांनी एकास पकडले. त्याच्याकडून मटका जुगाराचे साहित्य, नगदी रक्कम व मोबाईल जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरात व ग्रामीण भागात मटका जुगाराचे जाळे पसरविले आहे. मटका बुक्या राजरोसपणे सुरू असल्याचे निदर्शनास येताच केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वेंकटराम यांनी अंबाजोगाईच्या पोलिसांच्या मदतीने शहरात छापेमारीचे सत्र सुरू केले . अनेक मटका बुकी एजंटवर कारवाई करीत अनेक एजंटवर गुन्हे दाखलकरण्यात आले. त्यानंतर केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी ही घाडी मारल्या होत्या. त्यातून ही जनावरांच्या सरकारी दवाखाना परिसरात चालता फिरता कमिशनवर मटका जुगार घेत होता. ही माहिती मिळताच फौजदार अमिरोद्दीन इनामदार, पोलीस नाईक संतोष गित्ते यांनी छापा मारून एकास पकडले. त्याच्याकडील मटका जुगाराचे साहित्य, नगदी तीन हजार ३० रुपये व चार हजाराचा मोबाईल जप्त केला. फौजदार अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केज पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis