
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर (हिं.स.)मतचोरी आणि एसआयआर प्रक्रियेतील अनियमिततेचा निषेध करण्यासाठी काँग्रेस १४ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान दिल्लीच्या रामलीला मैदानावर एक मोठी रॅली काढणार आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी या रॅलीत उपस्थित राहतील.या मुद्द्यावरील स्वाक्षरी मोहिमेतील कागदपत्रे देखील सादर केली जातील आणि नंतर राष्ट्रपतींना पाठवली जातील.
काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, मतांची चोरी ही भारतीय लोकशाहीसाठी एक मोठा धोका बनली आहे आणि त्याविरुद्ध देशव्यापी संदेश देणे आवश्यक आहे. त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर निवडणूक प्रक्रियेत पक्षपात केल्याचा आरोप केला.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने बिहार निवडणुकीत झालेल्या दारुण पराभव आणि 'मतचोरी'च्या मुद्द्याबाबत १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रभारी, राज्य युनिट प्रमुख, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि सचिवांची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत असे ठरवण्यात आले की, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एसआयआर विरोधात काँग्रेस मोठी रॅली काढेल. बैठकीत असेही सुचवण्यात आले की, निवडणुकीदरम्यान महिलांना १०,००० रुपये देण्यासारख्या योजनांसारखी पावले इतर कोणत्याही राज्यांनी उचलू नयेत. तसेच, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर मतदार यादीतून कोणतेही नाव जोडू नये किंवा वगळू नये.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे