गॅलेक्सी टॅब A11+ लवकरच येणार भारतात
मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतातील सर्वात मोठा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंग लवकरच आपला नवीन बजेट-फ्रेंडली टॅबलेट ‘गॅलेक्सी टॅब A11+’ भारतीय बाजारात सादर करणार आहे. विशेष म्हणजे, A-सीरिजमध्ये प्रथमच गॅलेक्सी एआयचे प्रमुख फीचर्स उपलब्ध ह
Galaxy Tab A11+


मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतातील सर्वात मोठा कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंग लवकरच आपला नवीन बजेट-फ्रेंडली टॅबलेट ‘गॅलेक्सी टॅब A11+’ भारतीय बाजारात सादर करणार आहे. विशेष म्हणजे, A-सीरिजमध्ये प्रथमच गॅलेक्सी एआयचे प्रमुख फीचर्स उपलब्ध होणार असून शिक्षण, प्रोडक्टिव्हिटी आणि एंटरटेनमेंटसाठी हा टॅबलेट एक महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.

या टॅबलेटमध्ये गुगल जेमिनी, गुगलसह सर्च करण्यासाठी सर्कल आणि सॅमसंग नोट्स मधील Solve Math ही तीन अत्याधुनिक एआय फीचर्स प्री-इन्स्टॉल्ड स्वरूपात दिली जाणार आहेत. गुगल जीईमिनी मुळं स्क्रीनवरील मजकूर, व्हिडिओ किंवा प्रतिमांसोबत थेट संवाद साधून प्रश्न विचारता येतील. Circle to Search फीचरद्वारे कोणत्याही अ‍ॅपमधून फक्त बोटानं स्क्रीनवर वर्तुळ काढताच त्वरित सर्चची सुविधा मिळेल. तर Samsung Notes मधील Solve Math फीचर हस्तलिखित किंवा कॅमेरा स्कॅन केलेली गणिती उदाहरणे क्षणार्धात सोडवून स्टेप-बाय-स्टेप समाधान देईल. विद्यार्थी, शिक्षक आणि ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.

परफॉर्मन्सच्या दृष्टीने गॅलेक्सी टॅब A11+ मध्ये 4nm प्रोसेसवर आधारित MediaTek MT8775 (Dimensity 6020 समतुल्य) प्रोसेसर दिला आहे, जो मल्टीटास्किंग, ऑनलाइन क्लास, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि लाइट गेमिंगसाठी स्मूथ अनुभव देईल. 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज असे दोन व्हेरियंट बाजारात उपलब्ध होतील. microSD कार्डद्वारे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवण्याची सुविधा आहे, ज्यामुळे लेक्चर व्हिडिओ, ई-बुक्स आणि ऑफलाइन कोर्सेस सहज साठवणे शक्य होईल.

डिझाइनच्या बाबतीत हा टॅबलेट मेटल फिनिशसह आकर्षक लुकमध्ये येणार असून 11 इंचाचा अंदाजे 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळण्याच्या चर्चा आहेत. क्वाड स्पीकर्स आणि Dolby Atmos सपोर्टमुळे म्युझिक व मूव्ही अनुभव अधिक प्रभावी होईल. सॅमसंगनं सांगितलं की ऑनलाइन शिक्षण आणि वर्क-फ्रॉम-होम संस्कृतीमुळं भारतात टॅबलेटची मागणी वेगानं वाढत आहे आणि प्रीमियम AI फीचर्स बजेट किंमतीत देत कंपनी या सेगमेंटमध्ये आपली पकड आणखी मजबूत करणार आहे.

या मॉडेलची किंमत अंदाजे 18,999 रुपये पासून सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून अधिकृत लाँच डेट आणि अचूक किंमत लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande