
मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। गुगलने काही महिन्यांपूर्वी सादर केलेल्या ‘नॅनो बनाना’ टूलचे अपग्रेडेड व्हर्जन ‘नॅनो बनाना प्रो’ बाजारात आणले आहे. Gemini 3 Pro-आधारित या इमेज जेनरेशन आणि एडिटिंग मॉडेलमध्ये मल्टिपल अॅस्पेक्ट रेशिओ, 4K आउटपुट, कलर कंट्रोल, फोकस आणि लाइटिंग एडिटिंगसारख्या प्रोफेशनल फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. कागदावरील स्केचेसपासून लोगो तयार करणे, डिटेल्ड इन्फोग्राफिक्स बनवणे आणि जटिल व्हिज्युअल्स डिझाइन करणे आता अधिक सोपं आणि जलद होणार आहे. तयार होणाऱ्या सर्व इमेजेसवर SynthID वॉटरमार्क असेल, ज्यामुळे AI-जनरेटेड कंटेंट ओळखणे सोयीचे होईल.
हे मॉडेल मुख्यतः Google AI Plus, Pro आणि Ultra सबस्क्रायबर्सना Gemini अॅपमध्ये उपलब्ध होणार असून त्यांना अधिक उच्च इमेज जेनरेशन कोटा आणि ॲडव्हान्स्ड क्रिएटिव्ह क्षमता मिळतील. फ्री-टियर यूजर्सना मर्यादित वापरानंतर मूळ नॅनो बनाना मॉडेलवर परत जावे लागेल. अॅडवरटायझर्स आणि मार्केटिंग प्रोफेशनल्ससाठी हे Google Ads मध्ये उपलब्ध असून Workspace कस्टमर्स Google Slides आणि Vidsमध्ये त्याचा वापर करून आकर्षक, पॉलिश्ड कंटेंट तयार करू शकतील. तसेच डेव्हलपर्स आणि एंटरप्राइज टीम्स Gemini API, Google AI Studio आणि Vertex AIद्वारे स्केलेबल इमेज-रिच अॅप्लिकेशन्स तयार करू शकतील. फिल्ममेकर्स, क्रिएटिव्ह्स आणि मार्केटर्ससाठी Flow फिल्ममेकिंग टूलमध्ये याचा उपयोग क्वालिटी, प्रिसिजन आणि कंट्रोल वाढवण्यासाठी होणार आहे.
नॅनो बनाना प्रोची सर्वात मोठी ताकद म्हणजे Gemini 3 चे ॲडव्हान्स्ड रीझनिंग, ज्यामुळे हे मॉडेल अधिक अचूक, काँटेक्स्ट-रिच विज्युअल्स तयार करते. रिअल-वर्ल्ड माहिती किंवा यूजर-प्रोव्हायडेड कंटेंटवर आधारित शैक्षणिक इन्फोग्राफिक्स, डायग्राम्स, एक्सप्लेनर्स तसेच Google Search इंटिग्रेशनमुळे रेसिपीसारख्या रिअल-टाइम डेटावर आधारित फ्लॅशकार्ड्ससुद्धा बनवता येतील. टेक्स्ट रेंडरिंगमध्ये मोठी सुधारणा करण्यात आली असून आता इमेजमध्ये लेगिबल आणि अचूक मजकूर थेट तयार होईल. टॅगलाईन्सपासून पॅराग्राफ्सपर्यंत आणि मल्टिपल भाषांमध्ये टेक्स्ट जनरेशन शक्य आहे.
हे मॉडेल 14 रेफरन्स इमेजेस ब्लेंड करून एक कोहेसिव्ह आउटपुट तयार करू शकते आणि 5 पर्यंत व्यक्ती किंवा कॅरेक्टर्सची कन्सिस्टन्सी कायम ठेवते. स्केचेसला फोटोरिअलिस्टिक उत्पादनांमध्ये बदलणे, ब्लूप्रिंट्सचे 3D रेंडर्स करणे, सर्रेल सीन डिझाइन करणे किंवा ब्रँडेड मॉकअप्स बनवण्यासाठी हे अत्यंत प्रभावी आहे. कॅमेरा अँगल्स बदलणे, फोकस शिफ्ट करणे, डेप्थ ऑफ फील्ड, बोकेह इफेक्ट्स, कलर ग्रेडिंग आणि लाइटिंग अॅडजस्टमेंटसारखे एडिटिंग कंट्रोल्स उपलब्ध आहेत. तसेच अनेक अॅस्पेक्ट रेशिओ आणि 4K रिझोल्यूशन आउटपुटमुळे प्रोफेशनल-ग्रेड क्वालिटी सहज साध्य होते.
नॅनो बनाना प्रोमुळे गुगलची AI-आधारित इमेज टूल्स प्रणाली अधिक शक्तिशाली, सुलभ आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसाठी उपयुक्त ठरली असून Adobe Firefly आणि Photoshopसारख्या साधनांशी इंटिग्रेशनमुळे नवीन संधी उघडल्या जात आहेत. Gemini अॅपमध्ये फ्री ट्राय उपलब्ध असून प्रो फीचर्ससाठी सबस्क्रिप्शन घेणे आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule