
मुंबई, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। - भारतातील आघाडीच्या ल्युब्रिकंट ब्रँडपैकी एक असलेल्या गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडने रविवार, 9 नोव्हेंबर 2025 रोजी बहुचर्चित चाय-पकोडा राइड 2025च्या मुंबई आवृत्तीचे उद्घाटन केले. आशियातील सर्वात मोठा मोटरसायकलिंग महोत्सव - इंडिया बाइक वीकचे (IBW) मुख्य प्रायोजक म्हणून त्यांच्या सहकार्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. यंदाच्या राइड्समुळे पुन्हा एकदा मोटारसायकलिंगद्वारे सौहार्द, साहस आणि सामाजिक भावनेच्या उत्सवासाठी मंच तयार केला आहे. गेल्या दोन वर्षांत, या उपक्रमाच्या माध्यमातून 20 शहरांमधील 12000+ रायडर्स आणि मोटरसायकलप्रेमींना आकर्षित केले आहे. यामुळे या राइड्स देशातील सर्वाधिक उत्साहाच्या सामाजिक बाइकिंग अनुभवांपैकी एक ठरल्या आहेत.
यंदाच्या मुंबई राईडमध्ये बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात 1100+ बाईकर्स एकत्र आले आणि नंतर खोपोली येथील यूकेज रिसॉर्टपर्यंत 46 किमीचा प्रवास केला. या राईडमध्ये सर्वांनीच एकत्रितरित्या मोकळ्या रस्त्यांचा थरार अनुभवला. सुरक्षेचा प्राधान्याने विचार करून, गल्फने प्री-राईड ब्रीफिंग आणि सेफ्टी ड्रिलचे आयोजन केले होते, ज्यामध्ये अनुभवी आयबीडब्ल्यू मार्शल सुरळीत समानव्यासाठी वेगवेगळ्या गटांमध्ये राईडचे नेतृत्व करत होते. प्रत्येक सहभागीला सेफ्टी राईडिंग गियरचे देखील वाटप करण्यात आले होते. ज्यामुळे ब्रँडची सुरक्षित आणि जबाबदार राईडिंगची वचनबद्धता अधोरेखित झाली. कार्यक्रमाचा शेवट गंतव्यस्थानावरील परस्परसंवादी आव्हाने आणि मजेदार ऍक्टिव्हिटीजने झाला. मोटारसायकलिंगच्या एकत्रित संस्कृतीचे क्षण साजरे केले गेले.
या प्रसंगी गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. रवी चावला म्हणाले, “चाय-पकोडा राईड्स ही बाइकप्रेमी लोकांसाठी एक आनंदाची गोष्ट बनली आहे. यंदा मुंबईला आणखी एक अविस्मरणीय अनुभव देण्याचा आम्हाला आनंद होतो आहे. इंडिया बाइक वीकसोबतची आमची सातत्यपूर्ण भागीदारी गल्फची केवळ गतिशीलता वाढवण्याचीच नव्हे तर रायडर्सची आवड, स्वातंत्र्य आणि बंधुत्व साजरे करणारे अनुभव निर्माण करण्याची वचनबद्धता दर्शवते. ग्राहकांना प्राधान्य देणारी कंपनी म्हणून, हे अनुभव आम्हाला जनमानसाची आवड ओळखण्यास मदत करतात. गल्फला रायडर्सकडून ज्या कामगिरीची आणि विश्वासार्हतेची अपेक्षा आहे ते अनुभवण्यास सक्षम करतात. रायडर्सना एक अविस्मरणीय अनुभव देण्यासोबतच, त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास बळकट होईल, अशी आमची अपेक्षा आहे.”
आता 12व्या वर्षात, पदार्पण करताना मोटारसायकल संस्कृतीचा देशातील प्रमुख उत्सव म्हणून इंडिया बाइक वीकने स्वतःला दृढपणे स्थापित केले आहे. रायडर्ससाठी ही एक अशी जागा आहे, जिथे रायडर्स एकत्र येऊन एकमेकांशी जोडले जातात, त्यांचे अनुभव शेअर करतात आणि मोकळ्या रस्त्यावरून गाडी चालवण्याची त्यांची आवडीला प्रोत्साहन देतात. त्यांच्या खास राइड्समध्ये समावेश असलेली चाय-पकोडा राइड दिवसेंदिवस विस्तारत चालली आहे. यामुळे बाईकर्सना निसर्गरम्य मार्ग एक्सप्लोअर करण्याची, चहा आणि गप्पांमधून एक नाते तयार करण्याची आणि मोटारसायकलची सामायिक आवड जपण्याची संधी मिळते.
इंडिया बाइक वीकच्या सुरुवातीच्या काळातील उपक्रम असलेल्या चाय-पकोडा राईड्सचे प्रमाण आणि लोकप्रियता सातत्याने वाढतेच आहे. अनेक शहरांमध्ये त्याचा विस्तार झाला असून बाइकिंग समुदायाशी थेट संवाद साधण्यासाठी गल्फची केंद्रे तयार केली जात आहेत. गल्फच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे, या राईड्स रस्ते सुरक्षा, साहस आणि सामुदायिक सहभाग असलेल्या एका प्रवासाचा उत्तम अनुभव देतात. अनेक शहरांमधील विस्तार आणि दरवर्षी वाढणारे सातत्यपूर्ण प्रमाण या माध्यमातून ते गल्फला भारताच्या बाइकिंग समुदायाशी थेट जोडले जाण्यासाठी एक शक्तिशाली मंच तयार करून देतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर