हेराक्लेस ऑफ लव्हासा 3.0 : ‘रन बिफोर क्लायमेट चेंज’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
रायगड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। क्राईस्ट युनिव्हर्सिटी लव्हासा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हेराक्लेस ऑफ लव्हासा 3.0 या भव्य मॅरेथॉन स्पर्धेला यंदा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. “चेंज बिफोर क्लायमेट चेंज” या प्रभावी संकल्पनेवर आधारित आणि #‘रन बिफोर
हेराक्लेस ऑफ लव्हासा 3.0 : ‘रन बिफोर क्लायमेट चेंज’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


रायगड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। क्राईस्ट युनिव्हर्सिटी लव्हासा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हेराक्लेस ऑफ लव्हासा 3.0 या भव्य मॅरेथॉन स्पर्धेला यंदा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. “चेंज बिफोर क्लायमेट चेंज” या प्रभावी संकल्पनेवर आधारित आणि #‘रन बिफोर क्लायमेट चेंज’ या संदेशासह 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.45 वाजता ही मॅरेथॉन होणार आहे. पर्यावरण रक्षणाचा ठोस संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे लव्हासा परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

यंदाच्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन पूजा मेहरा आणि लेफ्टनंट कर्नल निशाद कुमार हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे तरुणांमध्ये पर्यावरणाबद्दलची जागरूकता अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. या मॅरेथॉनसाठी आतापर्यंत 300 पेक्षा अधिक सहभागी नोंदणीकृत झाले असून त्यांच्या माध्यमातून प्रदूषण, वृक्षतोड, हवामानबदल आणि शाश्वत जीवनशैली याबाबत समाजात जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. पर्यावरण संरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी या उपक्रमाची निवड करण्यात आली असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.हेराक्लेस ऑफ लव्हासा 3.0 ही मॅरेथॉन पूर्णपणे ‘ग्रीन इव्हेंट’ म्हणून आयोजित केली जात आहे.

यामध्ये किमान कागदोपयोग, पर्यावरणपूरक गुडी बॅग, कमी कचरा निर्मिती आणि शाश्वत सवयींचे प्रोत्साहन देणारी जागरूकता स्टॉल्स अशी विशेष वैशिष्ट्ये असतील. सर्व वयोगटातील सहभागींसाठी हा उपक्रम एकत्र येऊन पृथ्वीचे रक्षण करण्याचा संदेश देणार आहे.धावणे, चालणे किंवा फक्त उत्साह वाढवणे—प्रत्येक पावलातून पर्यावरण संवर्धनाचा मजबूत संदेश दिला जाईल. “हेराक्लेस ऑफ लव्हासा 3.0 : रन विथ पर्पज, रन फॉर द प्लॅनेट” या घोषवाक्यासह हा उपक्रम हिरव्या भविष्याकडे एक महत्वपूर्ण पाऊल टाकणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande