
- पराभव झाला की मशीन दोषी हे योग्य नाही
- आताचे केंद्रातील सरकार खूप सक्रिय
कोल्हापूर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।
जेव्हा विजय मिळतो तेव्हा हाच ईव्हीएम योग्य वाटतो आणि पराभव झाला की अचानक मशीन दोषी ठरते, अशी टीका जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी करून पहलगामसारख्या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीर १५ वर्षे मागे गेल्याचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. मी आता राजकीय संन्यास घेतला आहे. त्यामुळे मी कोणत्याही बाजूचा नाही. पण, आताचे केंद्रातील सरकार खूप सक्रिय आहे, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं. गुलाम नबी आझाद कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
त्यांनी काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती, पर्यटन क्षेत्राची झालेली पडझड आणि देशातील राजकीय परिस्थिती यावर त्यांनी भाष्य केले. पहलगामसारख्या हल्ल्यांमुळे जम्मू-काश्मीर अनेक वर्षे मागे गेल्याचे ते म्हणाले. या घटनेनंतर पर्यटन अचानक कोसळले, हजारो पर्यटकांनी काश्मीरच्या दौरे रद्द केले आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटन क्षेत्राला जबर धक्का बसला. लहान-लहान हॉटेल व्यवसायिक, टुरिस्ट, टॅक्सी चालक आणि स्थानिक मार्गदर्शक यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले असल्याचे ते म्हणाले. मात्र आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली असून अशा प्रकारचे मोठे दहशतवादी हल्ले पुन्हा होतील, अशी शक्यता नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे पर्यटकांनी पुन्हा एकदा या प्रदेशाला भेट द्यावी, असे त्यांनी आवाहन केले.
देशातील निवडणूक प्रक्रियेवर वेळोवेळी उपस्थित होणाऱ्या शंकांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ईव्हीएमवर आरोप करणाऱ्यांकडे कोणताही ठोस पुरावा नसताना ते केवळ पराभवानंतर शंका घेतात, असा त्यांचा आरोप आहे. पाच वर्षे लोकांमध्ये न जाता केवळ निवडणूक जाहीर झाली की राज्यात उडी मारण्याची सवय विरोधकांमध्ये वाढत चालली आहे, असे ते म्हणाले. वर्षभर व्होट करणारेच पराभूत झाले, असेही ते म्हणाले. बिहारमध्ये नव्याने भाजपचा विजय जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगेच आता तयारी पश्चिम बंगालची असे म्हटल्याचे आझादांनी स्मरण करून दिले.
भारताचा स्वर्ग असणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळं जम्मू-काश्मीर खूप मागं गेलं आहे, पर्यटक येत नसल्यानं स्थानिक नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या हल्ल्याचा परिणाम लहान हॉटेल, टुरिस्ट वाहन चालक, टूर गाईड यांच्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. पण, भारतात पुन्हा असा हल्ला होईल असं वाटत नाही, असं म्हणत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पर्यटकांना पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये येण्याचं आवाहन केलं. तसंच झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत, असं म्हणत त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
काँग्रेसवर हल्लाबोल : बिहारमधील निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल जिंकण्याच्या तयारीची घोषणा केली. मात्र, इतर पक्ष निवडणुका जाहीर झाल्या तरी त्या त्या राज्यामध्ये जात नाहीत. अशा कार्य पद्धतीनं निवडणुका जिंकता येत नाहीत, असं म्हणत गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला. गेल्या वर्षभरापासून वोट चोरी म्हणणारे देखील या निवडणुकीत देखील पराभूत झाले. ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली जाते. मात्र, आतापर्यंत कोणीही ते सिद्ध केलं नाही. जो पक्ष पराभूत होतो तो अशा पद्धतीनं शंका घेत असतो. पाच वर्षे राजकीय पक्षांनी लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे. मी आता राजकीय संन्यास घेतला आहे. त्यामुळे मी कोणत्याही बाजूचा नाही. पण, आताच केंद्रातील सरकार खूप सक्रिय आहे, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar